लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, वाराणसी येथील पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडे, स्वागताध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, तसेच विरुपाक्ष जड्डीपाल, डॉ. रवींद्र मुळे, संमेलन समितीचे अध्यक्ष अनिल भालेराव, संयोजक दुर्गादास मुळे आदींची उपस्थिती होती. डॉ. सिंह म्हणाले की, जसे सूर्य, वेदात विज्ञान दडले आहे. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ‘वेद’ शिकविले, तर समाजातील अपराध कमी होतील. जड्डीपाल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर भालेराव यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन मंजूषा कुलकर्णी व पार्थ बाविस्कर यांनी केले. सुनील सुतावणे यांनी आभार मानले.शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी सांगितले की, नुसते वेद मुखोद्गत करून चालणार नाही. त्यानुसार दैनंदिन जीवनात आपले आचरण करा. वेद मुखोद्गत करणे हे काही सोपे काम नव्हे. सर्वांनाच चार वेद मुखोद्गत करणे शक्य नाही. त्याकरिता कोणी वेद मुखोद्गत करावेत, कोणी वेदाचा अर्थ जाणून घ्यावा, असे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार सर्वांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.दरवर्षी ११ वैदिकांना पुरस्कार देण्याची घोषणाडॉ. सिंह यांनी अखिल भारतीय वैदिक संमेलनात घोषणा केली की, केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी ११ वैदिकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ३५ वर्षांखालील वैदिकांना ५ पुरस्कार तेही प्रत्येकी १ लाख रुपयांचे देण्यात येणार आहेत. यातून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या वेद मुखोद्गत करणाºयांची प्रतिष्ठा वाढविणे व ‘वेद’ आत्मसात करण्याची लोकांना प्रेरणा मिळावी, असा उद्देश आहे.
शाळा, महाविद्यालयांत ‘वेद’ शिकविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:06 AM
वैदिक धर्म हा मानवनिर्मित नाही. सृष्टीच्या निर्मितीपासूनच ‘वैदिक धर्मा’चे अस्तित्व आहे. ‘वेदा’मध्ये हिंदुस्तान, हिंदू असा उल्लेख कुठेच नाही. कारण, वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात ‘वेद’ शिकविले पाहिजेत. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मानव संसाधान विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली.
ठळक मुद्देसत्यपाल सिंह : अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्घाटन; शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांची उपस्थिती