शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

शिक्षक संघटनाही रडारवर

By admin | Published: May 08, 2016 11:58 PM

औरंगाबाद : तालुकास्तरीय बदली प्रक्रियेत केवळ शासन मान्य शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाच सूट देण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम

विशाखापट्टणम : शिखर धवनसह आघाडीच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानानंतर अनुभवी आशिष नेहरा व बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या नवव्या पर्वात रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा ८५ धावांनी धुव्वा उडवला. धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने ३ बाद १७७ धावांची दमदार मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव १६.२ षटकांत ९२ धावांत गुंडाळला. नेहरा व मुस्तफिजुर यांनी अनुक्रमे १५ व १६ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेत मुंबई इंडियन्सचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बरिंदर सरनने १८ धावांत दोनस तर मोझेस हेन्रिक्स व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. मुंबई इंडियन्सच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात हरभजन सिंगने सर्वाधिक २१ धावा केल्या. सनरायझर्सचा नऊ सामन्यांतील हा सहावा विजय असून त्यांच्या खात्यावर १२ गुणांची नोंद झाली आहे. सनरायझर्सने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे, पण गुजरात लायन्स व केकेआर संघांदरम्यानच्या लढतीनंतर त्यांची गुणतालिकेत घसरण होणार असल्याचे निश्चित आहे. या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी १२ गुणांची नोंद आहे. या मोसमात १० वा सामना खेळणाऱ्या मुंबई संघाला पाचव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी, शिखर धवनचे अर्धशतक व त्याने डेव्हिड वॉर्नर व युवराज सिंग यांच्यासोबत केलेल्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ३ बाद १७७ धावांची दमदार मजल मारली. धवनने ५७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ८१ धावांची खेळी केली. त्याने वॉर्नरसोबत (३३ चेंडूंत ४८ धावा) आणि युवराज सिंग (२३ चेंडूंत ३९ धावा) यांच्यासोबत अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या विकेटसाठी प्रत्येकी ८५ धावांच्या भागीदारी केल्या. युवराजने सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याने डेथ ओव्हर्समध्ये धवनच्या साथीने ४ षटकांत ४७ धावा वसूल केल्या. हरभजन सिंग मुंबईतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)धावफलकहैदराबाद सनरायझर्स : डेव्हिड वॉर्नर झे. पोलार्ड गो. हरभजन ४८, शिखर धवन नाबाद ८१, केन विल्यम्सन झे. रोहित गो. हरभजन ०२, युवराज सिंग हिटविकेट मॅक्लेनघन ३९, मोझेस हेन्रिक्स नाबाद ०१. अवांतर : ५. एकूण : २० षटकांत ३ बाद १७७. गोलंदाजी : साऊदी ४-०-३५-०, मॅक्लेनघन ४-०-३८-१, हरभजन ४-०-२९-२, बुमराह ४-०-३५-०, हार्दिक पंड्या १-०-१०-०, पोलार्ड २-०-२३-०, कृणाल पंड्या १-०-५-०.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा त्रि. गो. नेहरा ०५, पार्थिव पटेल पायचित गो. भुवनेश्वर ००, अंबाती रायुडू झे. विल्यम्सन गो. नेहरा ०६, कृणाल पंड्या झे. धवन गो. सरन १७, जोस बटलर झे. ओझा गो. नेहरा ०२, किरॉन पोलार्ड झे. सरन गो. हेन्रिक्स ११, हार्दिक पंड्या झे. ओझा गो. मुस्तफिजुर ०७, हरभजन सिंग नाबाद २१, टीम साऊदी झे. ओझा गो. मुस्तफिजुर ०३, मिशेल मॅक्लेनघन झे. हेन्रिक्स गो. मुस्तफिजुर ०८, जसप्रीत बुमराह झे. ओझा गो. सरन ०६. अवांतर : ६. एकूण : १६.३ षटकांत सर्व गोलंदाजी : भुवनेश्वर ३-०-२३-१, नेहरा ३-०-१५-३, सरन ३.३-०-१८-२, हेन्रिक्स ४-०-१८-१, मुस्तफिजुर ३-०-१६-३.