--
एक वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइनच शिकताहेत. काही काळ शाळा सुरू झाली, त्यालाही फारसा प्रतिसाद नव्हता. लाॅकडाऊन लावण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. अंशतः लाॅकडाऊनमध्येही जिल्ह्याला काही फायदा झाला, असेही वाटत नाही. बाधित गावांत जनजागृती करून तांडा, वाडी, वस्तीवर १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे.
-प्रकाश दाणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
--
कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा
--
लाॅकडाऊन मुळीच नको, त्याने प्रश्न सुटणार नाही. हातावरचे पोट असणाऱ्यांचा विचारही केला पाहिजे. मात्र, रुग्ण वाढताना लोक नियम पाळत नाहीत, हे चिंताजनक आहे. कंटेनमेंट झोन तयार करून त्यात नियमांची कडक अंमलबजावणी केली जावी. शिक्षणावर कोरोनाचा मोठा परिणाम जाणवतोय. त्यात आता परीक्षा घ्यायच्याच आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल द्यावेच लागतील. या काळात भीतीमुक्त वातावरण असावे. लाॅकडाऊनने पुन्हा अडचणी निर्माण होतील.
-संतोष खेडकर, शिक्षक, वडोदबाजार