शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

शिक्षकांकडून परीक्षा केंद्रात मोबाईलचा वापर

By admin | Published: March 20, 2016 12:37 AM

उस्मानाबाद : शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील सहा शिक्षकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी

उस्मानाबाद : शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील सहा शिक्षकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने मोबाईल जप्त केले. ही कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. शनिवारी येथील भोसले हायस्कूलमधील केंद्रावर सकाळी भूगोल-अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथक केंद्रावर धडकले. सदरील केंद्राची तपासणी करीत असतानाच पर्यवेक्षक आणि त्यांचे सहाय्यक म्हणून नेमण्यात आलेल्या सहा गुरूजींकडे मोबाईल असल्याचे दिसून आले. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सर्व मोबाईल जप्त केले. तसेच घटनेचाही पंचनामा केला. परीक्षेच्या काळात संबंधित कर्मचाऱ्यांनी सोबत मोबाईल बाळगू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही संबंधित शिक्षकांनी नियमाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे सदरील शिक्षकांचा अहवाल आता वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.