शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

शिक्षकांनो वेळीच सावध राहून जोडधंदा थांबवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

By विजय सरवदे | Published: November 07, 2023 12:23 PM

झेडपी ‘सीईओं’चा इशारा; गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके शोध घेणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षक जोडधंदा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांनी वेळीच सावध राहून ताबडतोब जोडधंदा बंद करावा व अध्ययन-अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे. अन्यथा, दोषींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जाहीर केला आहे.

यासंदर्भात मीना यांनी सांगितले की, अशा शिक्षकांचा शोध घेण्यासाठी ८ नोव्हेंबरपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. शिक्षकांनी फक्त शाळेच्या वेळेत मुलांना शिकवावे एवढेच नाही, तर त्यांनाही अभ्यास करावा लागणार आहे. नवनवीन बदलांविषयी अपडेट राहावे लागणार आहे. परंतु काही शिक्षक जोडधंदा करीत आहेत. काहीजण नातेवाईकांच्या नावे, तर काहीजण थेट स्वत:च प्लॉटिंग, विमा, हर्बल प्राॅडक्ट किंवा अन्य धंदे करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रधान शिक्षण देण्याकडे अशा शिक्षकांचे लक्ष नाही. गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, ही बाब गंभीर आहे. दिवाळी सुट्यांनंतर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अथवा गावातील व्यक्तीकडे नेमलेली ही पथके चौकशी करतील. त्यानंतर दोषी शिक्षकांविरुद्ध सेना-शर्थी कायद्यान्वये शिस्तभंगाची कारवाई करणार आहे.

आज पशुसंवर्धनची झाडाझडतीकेंद्र सरकारचे निर्देश असतानादेखील ‘लम्पी’ साथरोगाचे लसीकरण केल्याचे रेकॉर्ड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने ठेवलेले नाही. यासंदर्भात सातत्याने सूचना दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासनाकडून पुरवठा झालेल्या लसीकरणाच्या एकूण ‘डोस’पैकी अवघ्या ३८ टक्के नोंदी आढळून आल्या आहेत; मग, उर्वरित ‘डोस’ गेले कुठे? बाधित जनावरांचे लसीकरण केलेले असेल तर ‘ॲनिमल टॅगिंग नंबरसह’ त्याच्या ऑनलाइन नोंदी का करण्यात आलेल्या नाहीत, याचा आढावा घेण्यासाठी उद्या मंगळवारी या विभागाचा आढावा घेतला जाणार असून, दोषींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद