औरंगाबाद : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात होणाºया क्रीडा महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आणि बास्केटबॉलचा संघ रवाना झाला आहे. क्रीडा महोत्सवात विद्यापीठाचे एकूण १२० खेळाडू सहभागी होणार आहेत. संघासोबत १० व्यवस्थापक व १० प्रशिक्षक तसेच क्रीडा विभागाचे संचालक व ४ कार्यालयीन कर्मचारीही जात आहेत. गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाने उपविजेतेपद पटकावले होते तर कबड्डीचा संघ तिसºया क्रमांकावर राहिला होता. या संघाचे शिबीर विद्यापीठात २० नोव्हेंबरपासून सुरूहोते. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे (अॅथलेटिक्स), युसूफ पठाण, अनिता पारगावकर (खो-खो), डॉ. माणिक राठोड, साजेद चाऊस (कबड्डी), अभिजित दिख्खत, प्रवीण शिलेदार (व्हॉलीबॉल), सय्यद जमीर, गणेश कड (बास्केटबॉल) हे रवाना झाले आहेत. सुहास यादव, सीमादेवी मुंडे, फिरोज सय्यद, गंगाधर मोदाळे, योगेश निकम, मधुकर वाळके, ज्योती गायकवाड, युवराज आंधळे, अजय बढे हे व्यवस्थापक म्हणून संघासोबत गेले आहेत.संघातील खेळाडूंना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, पी. एस. जाधव, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवासाठी आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:03 AM