छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर स्थित आर.सी.बाफना या सुवर्णपिढीचे शुक्रवारी केंद्रीय जीएसटी विभागातील पथकाने सर्व्हेक्षण केले. यात खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली.
केंद्रीय जीएसटी विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी आर.सी.बाफना या सुवर्णपिढीत प्रवेश केला. त्यानंतर तिथील सोने-चांदी तसेच दागिणे खरेदी व विक्री बीलाची तपासणी करणे सुरु केले. स्टॉक रजिस्टर, लेखाविभागातील वह्या, बँक पासबुक, स्टेटमेंटची तपासणी केली जात होती. हे सर्व्हेक्षण मध्यरात्रीपर्यंंत सुरु होते. अचानक अधिकारी आल्याने तिथील कर्मचारी गोंधळून गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च एंडिंगचे कामे सुरु आहेत. उदिष्टपूर्तीसाठी ठिकठिकाणी सर्व्हेक्षण केले जात आहे. हे नियमित सर्व्हेक्षण असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या ६ जणांच्या पथकाने हे सर्व्हेक्षणात समावेश होता. बाहेरुन अधिकाऱ्यांचे पथक आले नव्हते. खरेदी व विक्रीच्या आकडेवारीत तफावत दिसून आल्याने हे सर्व्हेक्षण करण्यात आले. उदिष्टपूर्ती होई पर्यंत जिल्ह्यात हे सर्व्हेक्षण सुरुच राहणार आहे. व्यापाऱ्यांनी जीएसटीचे विवरण लवकरात लवकर दाखल करावे, असा इशारा सूत्रांनी दिली.
व्यापारी,उद्योगात चर्चेला उधाणकेंद्रीय जीएसटी विभागा नामांकित सुवर्णपिढीवर सर्व्हेक्षण करत असताना शहरात मात्र, चर्चेला उधाण आले होते. कोणी याचा संदर्भ ईडीच्या कारवाईशी जोडत होते. तर काही जण म्हणत होते की, राज्यातील नामांकित सुवर्णपिढीवर आता ईडीने लक्षकेंद्रीत केले आहे. कोणी म्हणत होते की, ही कारवाई राज्य जीएसटी विभागाची आहे तर काही व्यापारी सांगत होते की, ही प्राप्तीकर विभागाची कारवाई आहे. हे सर्व अफवा आहेत, हा केंद्रीय जीएसटीचा नियमित सर्व्हेक्षण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.