औरंगाबाद : चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करणाऱ्या कचरा वेचकास कालबाह्य झालेल्या अश्रुधुराच्या नळकांड्याचा बॉक्स सापडल्याने खळबळ उडाली. घनकचरा व्यवस्थापन प्रमुखांनी हा बॉक्स पंचनामा करून एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतला.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी आणल्या जाणाºया कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी काही कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कचरा वेचक शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे काम करीत होते.
यावेळी एका कचरा वेचकाच्या हाताला अश्रुधुराच्या नळकांड्या असलेला बॉक्स लागला. हा बॉक्स म्हणजे बॉम्ब असावा, अशी चर्चाही तेथील कर्मचारी करू लागले. त्यांनी ही बाब घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कळविली. भोंबे यांनी याबाबतची माहिती तातडीने एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तो बॉक्स ताब्यात घेतला. हा अश्रुधुराच्या नळकांड्याचा बॉक्स असून, २००४ साली त्याची निर्मिती झाली आणि २००७ साली तो कालबाह्य झाल्याचे बॉक्सवरील तारखेवरून समोर आले नळकांड्याचा हा बॉक्स पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारात जमा करण्यात आल्याचे पो.नि.माळाळे यांनी सांगितले.बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणीपोलिसांनी घटनास्थळ आणि परिसराची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी केली. मात्र कचरा प्रक्रिया परिसरात काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव चिकलठाण्यासह चारही कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.
दरम्यान पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्रागारातील अश्रुधुराच्या नळकांड्यांचा साठा आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यांची तपासणी प्रशासनाने केली असता, आयुक्तालयातील या नळकांड्या नसल्याचे समोर आले.-------------