खरीप हंगामातील ऑनलाइन ई-पीक पेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण केल्यामुळे सिल्लोड तालुका राज्यात अव्वलस्थानी आला आहे. त्यामुळे अचलपूर येथील तहसीलदार यांनी सिल्लोड तालुक्यातील मंडळामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास केला. शेतकरी तसेच ग्रामस्थांकडून ऑनलाइन ई-पिक पेरा कशाप्रकारे केला. काय अडचणी आल्या याबद्दल चर्चा करुन सखोल माहिती घेतली. यावेळी नायब तहसीलदार अक्षय मांडवे, तलाठी जगदीश पानसे, कौस्तुप रोकडे, पं. स. सदस्य सय्यद सत्तार बागवान, मंडळ अधिकारी जी. डी. दांडगे, तलाठी एस. एन इंगळे, ग्रामसेवक शिवाजी गायके, कृष्णा साखरे, नंदू शिंदे, जय जैस्वाल, दीपक पुरी, पोलीसपाटील नंदू बेडवाल, नारायण शेजूळ, नंदू चव्हाण, सुनील सोनवणे आदीेंची उपस्थिती होती.
---------------
फोटो ओळ : अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी बोरगाव बाजार येथील शेतकऱ्यांची ऑनलाईन ई-पीक पेरा विषयाबाबत संवाद साधला.