शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
4
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
5
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
6
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
7
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
8
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
9
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
11
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
12
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
13
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
14
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 11:41 AM

पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देस्वयंघोषणापत्र भरून घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश अलीकडे स्वस्त धान्य दुकानात एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यास ‘स्वयंघोषणापत्र’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानात तुम्ही गेल्यास धान्य देण्यापूर्वी तुमची जात विचारली जाते. त्यासाठी माहितीचा फॉर्म भरून दिल्यानंतरच मग धान्य दिले जाते. आपण २१व्या शतकात वावरताना अजूनही जात ही डोक्यातून जात नाही, हे दुर्दैव!

पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल. अलीकडे स्वस्त धान्य दुकानात एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यास ‘स्वयंघोषणापत्र’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. त्या फॉर्ममधील प्रश्न शिधापत्रिकाधारकाला भरून द्यायचे आहेत. त्यात ४ प्रश्न असून प्रवर्ग ‘एससी’ (अनुसूचित जाती) ‘एसटी’ (अनुसूचित जमाती) व इतर असे लिहिण्यात आले आहे. स्वस्त धान्य वितरक जेव्हा हा फाॅर्म भरून घेतो तेव्हा तुम्ही ‘एससी’ आहात की ‘एसटी’ व पुढे तुमची जात कोणती, असे विचारणा केली जाते. त्यावेळी चारचौघांत थेट जात विचारल्यामुळे शिधापत्रिकाधारक संताप व्यक्त करत आहेत. अनेक स्वस्त धान्य दुकानात यामुळे वितरक व ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमकीदेखील घडत आहेत. आमची ‘जात’ विचारण्याचे धाडस होतेच कसे. आता ‘जात’ बघून तुम्ही धान्य देणार आहात का, असा संतप्त सवाल नागरिक स्वस्त धान्य खरेदीदारांना करत आहेत. एकीकडे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला बळी पडणे व दुसरीकडे फॉर्म भरून घेण्यासाठी शासनाचा दबाव, यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे मात्र, ‘सँडविच’ होत आहे.

स्वयंघोषणापत्रावर सरकारचे नाव गायबस्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांकडून भरून घेतल्या जाणाऱ्या ‘स्वयंघोषणापत्रा’वर शासनाच्या नावाचा उल्लेख नाही. यात शिधापत्रिकाधारकाचे, कुटुंब प्रमुखाचे नाव, शिधापत्रिकेचा १२ अंकी क्रमांक, शिधापत्रिकेची योजना त्यात अंत्योदय अन्न योजना (एएव्ही), प्राधान्य कुटुंब योजना (पीएचएच), प्रवर्ग - एससी (अनुसूचित जाती), ‘एसटी’ (अनुसूचित जमाती), इतर, शिधापत्रिकेमधील एकूण सदस्यांची संख्या व एकूण सदस्यांपैकी दिव्यांग सदस्यांची संख्या अशी विचारणा करण्यात आली आहे.

लाभार्थींची जात विचारणे चुकीचेस्वस्त धान्य दुकानदार हे शासकीय अधिकारी नाहीत. आम्ही फक्त सरकारी लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे काम करतो. मात्र, रेशनसाठी आलेल्या लाभार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणापत्र’ भरून घेण्याचा शासनाकडून दबाव वाढत आहे. ‘तुमच्या सडलेल्या तांदूळ, गव्हासाठी आमची जात विचारता का’ असा संतप्त सवाल लाभार्थी विचारत आहे. त्यांच्या संतापाला वितरकाला सामोरे जावे लागत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे लाभार्थीची जात विचारणे चुकीचे आहे.- डी.एन. पाटील, राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकारAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा