पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव हे शहर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीतीरी वसलेले आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन होते....मात्र, माजलगाव येथील टेंबे गणपतीचे आगमन निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते. अर्थातच याला कारणही तसेच आहे....!स्वातंत्र्यपूर्व काळात १९०१ साली निजाम राजवटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रजाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली. यावेळी ही मिरवणूक मशीद चौकात अडविण्यात आली. त्यांना गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निजाम सरकारकडून मागितला गेला...परंतु मंडळाकडे परवाना नसल्याने काही तत्कालीन सदस्य परवाना आणण्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे घोड्यावर भाग्यनगर (हैदराबाद) येथे गेले. तेथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी आणली....! मात्र, हैदराबादला जाण्या-येण्यात चार दिवस निघून गेले....यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली. याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले...त्यामुळे कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो....!गणेश मंडळाला भेट द्यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी, उपाध्यक्ष यशवंत जोशी, सचिव वैभव जोशी, कोषाध्यक्ष अमोल मुळी, अनंत शास्त्री जोशी, दिगंबर पाठक, रवींद्र जोशी, किशोर जोशी, विवेक जोशी यांनी केले.
११७ वर्षांची परंपरा असलेला माजलगावचा टेंबे गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:49 AM