शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:27 IST

दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात दुपारनंतर शहरवासीयांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. याचा थेट परिणाम निसर्गावरही हाेत असून, शहरात दुपारी अवघ्या सहा तासांत सात ठिकाणी आग लागली. यात प्रामुख्याने दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली.

बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत एकीकडे हवामानात गारवा असताना गुरुवारी दुपारनंतर शहरात उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. चिकलठाणा वेधशाळेचे हवामान सहायक सुनील निकाळजे यांच्या माहितीनुसार, बुधवारी, गुरुवारी पश्चिम बंगालकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वातावरणावर परिणाम दिसून आल्याने रात्री पारा ६ अंशांनी घसरला होता. सकाळी ८ वाजेपर्यंत १२.४ अंश सेल्सिअस तापमान होते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३५.६ अंश सेल्सिअस कमाल नोंद झाली. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकणवाडीत घर पेटलेगुरुवारी सायंकाळी ६:३० वाजता कोकणवाडीच्या समाधान कॉलनीत रुग्णालयाच्या वरच राहणाऱ्या डॉ. दीपक लोहिया यांच्या घराला आग लागली. अग्निशमन अधिकारी दीपराज गंगावणे यांनी धाव घेत अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. देवघरापासून आगीची सुरुवात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कुटुंबाचे दोन लॅपटॉप, देवघरातील साहित्य, मसाज मशिन, वायर, साउंड सिस्टम, वायर जळून खाक झाले.

दुपारी १२ नंतर झाडी, गवतांना आग- दुपारी १२ वाजता दौलताबादच्या अब्दिमंडईत झाडांना आग.- १:३० वाजता हिमायत बागेतील मोठ्या परिसरातील गवताला आग.- १:४५ मिनिटांनी विद्यापीठातील बुद्धलेणी परिसरात झाडांनी आग.- २:१५ वाजता सिद्धार्थ उद्यानातील वाळलेल्या झाडांनी घेतला पेट.- ३:२६ मिनिटांनी आरटीओ परिसरातील कचऱ्याला आग.

कचऱ्यामुळे दुकान पेटलेनारेगावात कचऱ्याने दुकानाला आग लागली. कैसर खान यांच्या दुकानाजवळील कचऱ्याने सुरुवातीला पेट घेतला. आग वाढत गेल्याने दुकानही पेटल्याचे अग्निशमन अधिकारी सोमिनाथ भोसले यांनी सांगितले.

चढउतार कायम- यंदा ३ मार्च रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद.- ६ मार्च रोजी रात्रीतून तापमान सात अंशांनी घसरणीमुळे गारवा जाणवला.- गुरुवारी दिवसभरात कमाल ३५.६, तर किमान १२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद.- बुधवारी कमाल ३४.४, तर तापमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान राहिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFire Brigadeअग्निशमन दल