औरंगाबाद : शहरातील तापमानाचा पारा चांगलाच वाढत असून, फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी कमाल तापमान ३५.०, तर किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.कडाक्याच्या थंडीनंतर फेब्रुवारीच्या प्रारंभी तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले होते. शहरातील तापमान ६ फेब्रुवारी रोजी ३१ अंशांवर पोहोचले होते. तापमानात वाढ होत असताना अवघ्या दोन दिवसांनंतर शहरात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. ९ फेब्रुवारी रोजी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होत गेली. सोमवारी कमाल तापमान ३३.५ अंश नोंदले गेले होते. अवघ्या एका दिवसात तापमानाच्या पारा ३५ अंशांवर पोहोचला.शहरात आता दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. फेब्रुवारीतच तापमानात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत तापमान ४० अंशांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे घरातील नादुरुस्त कूलरची देखभाल-दुरुस्ती करण्याकडेही नागरिकांचा कल पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये टोप्या, स्कार्फ विक्र ीची दुकाने सजल्याचे दिसत आहे.
तापमानाचा पारा ३५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:36 PM