औरंगाबाद : ३१ डिसेंबरच्या रात्री वेदांतनगर हद्दीतून मंदिराची दानपेटी व मोंढा परिसरातून रिक्षा पळविणाऱ्या आरोपी बजाजनगर रोडवर पकडण्यात रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. संदीप काशीनाथ वाकळे (२३, रा. वडगाव कोल्हाटी) असे आरोपीचे नाव आहे. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी सांगितले की, चोरीची रिक्षा (एमएच १२ पीटी ७७६९) ही घेऊन आरोपी बजाजनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोेलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र साळुंके, शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, चालक साहाय्यक फौजदार अजहर कुरेशी यांच्या पथकाने रिक्षाचा पाठलाग केला. वाकळे याला थांबण्याचा इशारा केला असता तो वाहन पळवू लागला. अखेर झटापट करून पळून जात असताना त्याला अटक केली. यांनी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे पळविले होते. तर मोंढा परिसरातून रिक्षा दि. ३१ डिसेंबरला चोरून नेल्याची कबुली दिली.
आरोपी संदीप वाकळे याला रविवारी रात्री क्रांती चाैक पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. त्याचे साथीदार कृष्णा सुरडकर, समाधान ऊर्फ अशोक सोनवणे हे दोघे पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
(फोटो सिंगल)