लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पर्जन्यमान कमी असल्याने जिल्ह्यातील धरणातील सद्य:स्थितीचा पाणीसाठा सरासरीच्या तुलनेत कमी आहे़ परिणामी पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने वेळेत पेरण्या झाल्या़ यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली़ दरम्यान, जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण अन् कोरडे होत चाललेले जलसाठे यामुळे पिण्याच्या पाण्याची देखील भीषण परिस्थिती उद्भवली आहे़ नांदेड तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावात पावसाळा सुरू होऊनदेखील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होती़ अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढली नाही़ त्यामुळे जिल्ह्यात आॅगस्टमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली़जिल्हा प्रशासनाने मुखेडमध्ये ४ आणि हदगाव तालुक्यात एक टँकर सुरू केले आहे़ तर नांदेड शहराशेजारी असलेल्या वाडी, इंदिरानगर आदी भागातील नागरिकांना पाण्यासाठी कोसोदूर जावे लागते़ जिल्ह्यात ३१ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे येणाºया काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र सध्या आहे़ जिल्ह्यातील विविध गाव, तांड्यांना सन २०१७-१८ या उन्हाळी हंगामात टंचाई कालावधीत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून १ किलोमीटर अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंद करण्यात आले आहे़पुढील आदेशापर्यंत सदर पाणी हे पिण्याच्या प्रयोजनासाठी राखून ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे़
भूजल उपशावर तात्पुरती बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:23 AM