सोयगावातील धरणे आटत असून, पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरीही सध्या तालुका प्रशासन कोरोना नियोजनातच गुंतले असल्याने पाणीटंचाईवर होणाऱ्या उपाययोजना रखडल्या आहेत. तालुक्यात पाटबंधारे विभागाची प्रमुख ११ धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता मोठी आहे. मात्र, पहिल्यांदाच अकरापैकी दहा धरणे आटली आहेत. सोयगाव तालुक्यात आता वीस दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. दहा धरणांमधील पाण्याची पातळी दहा टक्क्यांवर आली असून, यामध्ये वरठाण- ५ टक्के, अंजना- ५ टक्के आणि अंजना- १ टक्का इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
चौकट
पाणीटंचाईचे सावट, उपाययोजना मात्र शून्य
सोयगाव तालुक्यातील धरणांमधील पाण्याचा साठा आटत चालला असून, तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. मात्र, तालुका प्रशासनाच्या यंत्रणा अद्यापही सुस्त असून, पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार झालेला नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
चौकट
धरणांची पातळी खालीलप्रमाणे
सोयगाव (वेताळ वाडी)- ३२ टक्के, बनोटी- २७, वरठाण- ६, हनुमंतखेडा- २१, अंजना- ५, गोंदेगाव- १, वरखेडी- ७, देव्हारी- १५, जंगलातांडा- ९, धिंगापूर- २० आणि काळदरी- १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.