शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

खाजगी बसची दहा टक्के भाडेवाढ; हंगामासह डिझेल दरवाढीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 3:37 PM

खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसुट्यांच्या कालावधीत खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते.

औरंगाबाद : खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळी सुट्यांमुळे विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.

सुट्यांच्या कालावधीत खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्यांचा हंगाम आणि डिझेल दर वाढल्याचे म्हणत भाडेवाढ करण्यात आली आहे. झालेली भाडेवाढ ही ‘एसटी’च्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट राहील, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचा दावा ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून होत आहे.

औरंगाबादेतून नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूरसह विविध शहरांसाठी खाजगी बस धावतात. सोलापूरसाठी ३५० रुपये असलेले भाडे आता ४०० रुपये आकारण्यात येत आहे. तर सोलापूर स्लीपर बससाठी ५५० रुपयांवरून ६३० रुपयांपर्यंत भाडे घेण्यात येत आहे. हंगाम नसताना नागपूर स्लीपर बसचे भाडे ६३० ते ७५० रुपयांपर्यंत आकारण्यात येते. परंतु आजघडीला खाजगी बसकडून ९५० ते १०५० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. अशाच प्रकारे अन्य मार्गांवरील भाड्यांमध्ये ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती खाजगी बस कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.

प्रवाशांची तक्रार नाहीगेल्या काही दिवसांत डिझेलचे दर वाढले आहेत. सुट्यांमुळे हंगाम सुरूअसल्याने काही मार्गांवरील बसच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ एसटी महामंडळाच्या तुलनेत दीडपटपेक्षा अधिक नाही. अधिक भाडे घेतले तर प्रवाशांची तक्रारी येतील. परंतु सध्या प्रवाशांची तक्रार नाही.- राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन