पोलिसांनी सांगितले की, रोहितची आई धुणीभांडी तर वडील मजुरी करून कुटुंब चालवितात. रोहित त्यांचा मोठा मुलगा होता. यावर्षी तो दहावीत असल्यामुळे त्याने चांगला अभ्यास करावा आणि दहावीमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. सायंकाळी त्याची आई अभ्यासावरून त्याला रागावली आणि कामावर निघून गेली. यानंतर घरी एकटा असलेल्या रोहीतने छतास असलेले लोखंडी हुकास दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी ६ वाजता त्याचे वडील कामावरून घरी आले तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी लोक आले आणि त्यांनी त्याला बेशुद्धावस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला घाटीत नेण्याचे सांगितले. घाटीतील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आई रागावल्याने दहावीच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:04 AM