शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

औरंगाबादमधील हिमायत बाग गोळीबार प्रकरणी दोघांना दहा वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 6:17 PM

औरंगाबाद शहरातील हिमायत बाग परिसरात एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

ठळक मुद्दे हिमायत बाग गोळीबार प्रकरणदोघांना दहा वर्षांची शिक्षादोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हिमायत बाग परिसरात एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शहरातील हिमायतबाग येथे 2012 मध्ये एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करुन हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ आणि मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील अखिल खिलजी यांना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ठोठावली, तर इतर दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी गेल्या महिन्यात सुनावणी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या 16 दिवसांत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज न्यायालयाने दोघांनी सुटका केली आणि दोघांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 26 मार्च 2012 रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. यावेळी दहशतवाद्यांनी एटीएसवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यात पोलीस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी अझहर ऊर्फ  खलील कुरेशी ठार झाला, तर महंमद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाला. यावेळी पाठलाग करून एटीएसने अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्यप्रदेश) याला गजाआड केले होते. त्यांच्याकडून 4 गावठी कट्टे, 2 रिव्हॉल्व्हर, 17 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या अतिरेक्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच,  याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते. 

टॅग्स :Courtन्यायालय