शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

संजय शिरसाटांच्या संपत्तीत दहापट वाढ; पाच वर्षांत ३ कोटीवरून ३३ कोटीवर, तीन गुन्हे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 14:15 IST

आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : सलग दोनवेळा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार पाच वर्षांत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत दहापट वाढ झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांची संपत्ती ३ कोटी ३१ लाखावरून तब्बल ३३ कोटी ३ लाखांवर गेली आहे. आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.

शिरसाट यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार ७६१ रुपये किमतीची शेतजमीन, तर ४ कोटी ७० लाख ४५ हजार ८६० रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे ६३ लाख ९८ हजार रुपये किमतीची जमीन आणि ५ कोटी ६५ लाख ५५ हजार ९८० रुपये किमतीचे फ्लॅट आहेत. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत १९ कोटी ६५ लाख ३२ हजार १५ रुपये इतकी आहे.

आ. शिरसाट यांच्याकडे पत्नीच्या नावे १८ लाख ५०० रुपये किमतीची कार आहे. तसेच सोन्याचे दागिने आणि एलआयसी, विविध बँकांतील ठेवी अशी एकूण १३ कोटी ३७ लाख ८८ हजार ४७२ रुपयांची गुंतवणूक आहे. आ. शिरसाट यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना आयोगाला सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार त्यांच्याकडे १ कोटी ९५ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती, तर त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ३६ लाख ५० हजार ६८० अशी एकूण ३ कोटी ३१ लाख ५० हजार ६८० रुपयांची मालमत्ता होती. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत दहा पट वाढ झाल्याचे दिसून येते.

एकूण मालमत्ता -३३ कोटी ३ लाख २० हजार ४८६ रुपयेस्थावर मालमत्ता : १९ कोटी ६५ लाख ३२ हजार १५ रुपयेजंगम मालमत्ता (सोने चांदीचे दागिने, कार, गुंतवणूक) :१३ कोटी ३७ लाख ८८ हजार ४७२ रुपयेरोकड : ४७ लाख २९ हजार ६९२ रुपयेकर्ज देणी : २६ कोटी ४५ लाख रुपये

तीन गुन्हे प्रलंबितआ. शिरसाट यांच्याविरोधात वाळूज दोन आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहेत. या गुन्ह्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमSanjay Shirsatसंजय शिरसाट