वाळूज महानगर : जिवनातील ताण-तणावापासून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी शनिवार ( दि.८) साऊथसिटीत येथे सीआयआय-आयडब्युएन व हार्टफुलनेस संस्थेच्यावतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमात ध्यान साधना केल्याने होणारे फायदे या विषयी तज्ज्ञांनी माहिती देऊन नागरिकांच्या शंकाचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआयआय-आयडब्ल्युएनच्या अध्यक्षा तथा इण्ड्रेस हाऊज कंपनीच्या सीएफओ स्मिता भारतिया तर मार्गदर्शक म्हणून हार्टफुलनेस संस्थेच्या मिनाक्षी भंसाली, मृदुला कौल्लाले, रुपेश कौल्लाले, दीपाली मुंदडा आदींची उपस्थिती होती.
या जनजागृती कार्यक्रमात तज्ज्ञ प्रशिक्षकांनी जिवनात ताण-तणावामुळे मनाची शांती हिरावली जात असून, नैराश्य येत असते. त्यामुळे अनेकजण एकाकीपणे जीवन जगत असतात. जिवनाचा खरा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जिवन जगण्याची आवश्कता आहे. एकाकीपणात आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करीत असतो त्याच गोष्टी करण्यासाठी मन तयार होत असते. नकारात्मक विचारामुळे निराशा येऊन त्याचे मन कुठेही रमत नाही. ध्यानसाधनेमुळे मन प्रसन्न होऊन नवीन कार्य करण्यास एक प्रकारची उर्जा मिळत असते.
जिवनात सुखशांतीसाठी ध्यानसाधना, स्वच्छता व प्रार्थना याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे रुपेश कौल्लाले यांनी विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना पटवून दिले. आयोजक स्मिता भारतीया यांनी ध्यान साधनेविषयी उपस्थिताना मार्गदर्शन करुन आयडब्ल्युएन मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी ‘बॅलन्सींग मार्डन लाईफस्टाईल विथ मेडिएशन’ या विषयी सविस्तर माहिती देऊन नागरिकांत जनजागृती करण्यात आली.
हार्टफुलनेस संस्थेच्या माध्यमातून २० प्रशिक्षक शहरातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी जनजागृती करुन जवळपास १००० नागरिकांना ध्यानसाधनेविषयी माहिती देऊन जनजागृती करीत असल्याचे संस्थेचे रुपेश कौल्लाले यांनी सांगितले. यावेळी आमरीन बानो या एमजीएम महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थीनीने ध्यान साधनेमुळे होणारे फायदे या विषयी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाºया किरण वाधवाणी, नेहा दरक, मनिषा पाटील, स्वाती श्राफ आदींची झाडे देऊन स्मिता भारतीया व रुपेश कौल्लाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.