शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:15 AM

सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांना सातत्याने निवेदने देण्यात आली. मात्र, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे निकाली काढली जात नाहीत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी पात्र शिक्षकांना सदरील वेतनश्रेणी मान्य केली आहे; परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून गरज नसतानाही जातवैधता व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.महिनाभरापूर्वी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.शनिवारी दुपारी आंदोलनकर्ते शिक्षकांची भेट घेण्यासाठी शिक्षण सभापती मीनाताई शेळके, जि.प. सदस्या पुष्पाताई काळे व शिक्षणाधिकारी लाठकर या आंदोलन मंडपात आल्या. तेव्हाही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षकांना जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची अट पूर्ण करावी लागेल, असे सांगितले.त्यानंतर सदरील संतप्त शिक्षकांनी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची भेट घेऊन प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचे सांगितले.आंदोलनात कृती समितीचे किरण पाटील, नितीन पाटील, रमेश नप्ते, अनिल जगदाळे, रतन पवार, ईश्वर पावरा, प्रकाश दाणे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, दिलीप ढाकणे, विजय साळकर, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, मच्छिंद्र भराडे, गोविंद उगले, कैलास गायकवाड आदींसह विविध संघटनांचे जवळपास ३०० शिक्षक सहभागी झाले होते.शेवटी धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन पाटील यांनी मानले.अन्यथा साखळी उपोषण करणारच्यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, प्रशासनाने शिक्षकांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. येत्या आठ दिवसांत चटोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर नवव्या दिवसांपासून जि.प. मुख्यालयासमोर कृती समितीच्या वतीने शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू केले जाईल.