औरंगाबाद : अफगाणिस्तानात सध्या जे काही चालू आहे, ते रोज आपण वृत्तपत्रे व दूरदर्शनवरून पाहातच आहोत. अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे अफगाणी ड्रायफ्रुट्सचे भाव न वाढले, तर नवलच. पाच- दहा टक्के नव्हे जवळपास ४० टक्क्यांनी ही भाववाढ झाली आहे. आधीच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जनता भरडली जात आहे. त्यात पुन्हा ड्रायफ्रुटची भाववाढ झाल्याने जगणेच महाग होत आहे.
भाव (प्रति किलो)
तणावापूर्वीचे भाव- सध्याचे भाव
पिस्ता. ८००. रु. ११०० रु.
जर्दाळू. ४००रु. ६७० रु.
खिसमिस. ४०० रु. ५०० रु.
अंजीर. ७०० रु. १००० ते ११००रु.
भारतात भरपूर स्टॉक ...
सध्या शहरात ड्राय्रफ्रुटचा भरपूर स्टॉक आहे. तुटवडा नाही. शहरातच नाही, तर संपूर्ण भारतात डायफ्रुटचा भरपूर स्टॉक असल्याचे औरंगाबादेतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
दर पूर्ववत होणे कठीण ....
मनुका, शहाजिरा, पिस्ता या पदार्थांचे भावही वाढतील. किमान २५ टक्के भाववाढ तर नक्कीच होईल. अफगाणिस्तानातील तणाव किती दिवस राहतो, त्यावर दर पूर्ववत होतील किंवा नाही, हे आताच सांगणे कठीण.
- महेंद्र बंब.
आताच ४० टक्के भाववाढ
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारतात अफगाणिस्तानी ड्रायफ्रूटच्या दरात वाढ झाली. आताच ही दरवाढ ४० टक्के इतकी झाली आहे. ती पूर्ववत कधी होईल, हे सांगता येत नाही.
- महावीर डोसी