औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. औरंगाबाद विभागातील २ हजार ४१५ माध्यमिक विद्यालयांचे १ लाख ८१ हजार ५७८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून, जिल्ह्यातील ६४ हजार ६६८ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. मराठी भाषेच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होणार आहे.तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसह माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांमध्ये जागृती केली आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये, यासाठी विभागीय मंडळाने समुपदेशन व हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, सिंधी या सहा भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दहावीची परीक्षा आजपासून
By admin | Published: March 01, 2016 12:31 AM