कन्नड : जीप व टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना कन्नड-पिशोर रस्त्यावरील चिकलठाण फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर १४ जण जखमी झाले. त्यापैकी आठ जण गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. शांताराम संतोष पवार (३५, रा. चिंचोली), गोकुळ संतोष काकरवाल (२१, रा. गणेशपूर), अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील राजपूत समाजाचा विवाहसोहळा खापरखेडा येथे होता. या विवाह समारंभासाठी गणेशपूर येथील वऱ्हाडी जीप (क्र. एम. एच. १६. आर ४४९६) ने पिशोरकडून कन्नडकडे जात होते, तर टेम्पो (क्र. एम.एच. १०. के. ७७२४) कन्नडकडून पिशाेरकडे जात होता. दोन्ही विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांमध्ये चिकलठाण फाट्यापासून दोनशे फुटावर जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की जीपचा अक्षरशः चुराडा झाला, तर टेम्पो जीपपासून सुमारे १०० फुटावर पलटी झाला. जीपचालक शांताराम संतोष पवार (३५, रा. चिंचोली लिं.) हा जागीच ठार झाला. जखमींपैकी गोकुळ संतोष काकरवाल (२१, रा. गणेशपूर) याने ग्रामीण रुग्णालयात प्राण सोडला. अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरिक, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि बलभीम राऊत व पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.
-------
हे आहेत जखमी
लखन भगवान मेहर (२१), देवसिंग नारायण निमवाळ (२५), संतोष फकीरचंद खोलवाल (३०), अनिल रतनसिंग काकरवाल (१६), सुनील संतोष काकरवाल (१५), रायसिंग नारायण निमवाळ (३०), अक्षय निमवाळ (२१), सर्व रा. गणेशपूर व सुभाष पवार (३४), रा.चिंचोली लि. या गंभीर जखमींना औरंगाबादेत उपचारासाठी नेण्यात आले. करण विजू राजरवाल (३०), राजू खोलवाल (२७), शामसिंग राजरवाल (२८), बहादूर खोलवाल (३०), सर्व रा. गणेशपूर या जखमींवर खाजगी दवाखान्यात व संजय फकीरचंद बारवाल (३५) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-----
फोटो : अपघातात अशाप्रकारे जीपचा चुराडा झाला आहे. तर