औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासह संस्थेतील अनेकांची नावे आहेत. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना मंत्रीपदावरून दूर ठेवावे, अशी मागणी विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.
दानवे म्हणाले, राज्यातील एका मुख्यमंत्र्यांने मुलीच्या परीक्षेतील गुणवाढ प्रकरणावरून राजीनामा दिला होता. आता तर राज्यातील कॅबिनेटमंत्री यांच्या मुलीचे नाव टीईटी घोटाळ्यात आले आहे. विशेष म्हणजे, सत्तरांच्या यांच्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षकांची नावे देखील या घोटाळ्यात आली आहेत. घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावे समोर आल्यानंतर सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धमकावले होते. यामुळे सत्तार यांचा या घोटाळ्यात समावेश आहे अथवा नाही हे चौकशी नंतर समोर येईल. मात्र तोपर्यंत त्यांना मंत्रीपदावरून बाजूला करा. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी ही दानवे यांनी केली.