‘क्रीमपोस्ट’ सोडवेना : नव्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळेना संधीसंजय तिपाले ल्ल बीडस्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) एक कर्मचारी पाच वर्षे काम करु शकतो; परंतु काही कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे हा विभाग सोडवत नाही. ‘क्रीमपोस्ट’ला चिकटून राहण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी उपशाखांमध्ये नियुक्त्या मिळविल्या असून ते उपशाखांच्या आडून गुन्हे शाखेचेच काम पाहत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांना या विभागात संधी मिळणे कठीण बनले आहे. जिल्हा पोलीस दलात शनिवारपासून वार्षिक बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच ठाण्यात किंवा विभागात पाच वर्षे कर्तव्य बजावणाऱ्यांच्या प्रशासकीय तर पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या जातात. स्थानिक गुन्हे शाखेसाठी गतवर्षीपर्यंत तीन वर्षाचा सेवा कालावधीची मर्यादा होती; परंतु यावर्षी ती पाच वर्षे केली आहे. प्रशासकीय बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून बदलीच्या ठिकाणांचे पसंती क्रमांक मागविले जातात. ठाण्यांमध्ये पाच वर्षे कर्तव्य केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी गुन्हे शाखेत काम करण्याची इच्छा दर्शवली; परंतु तेथे जागा रिक्त नाहीत असा कांगावा करण्यात आला. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधीच मिळायला तयार नाही.सूत्रांच्या माहितीनुसार गतवर्षी आठ कर्मचाऱ्यांचा सेवाकालावधी संपल्यानंतर त्यांना प्रशासकीय बदल्यांमध्ये बाहेर जावे लागणार होेते. मात्र, गुन्हे शाखेच्या तत्कालीन प्रमुखांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांची व्यवस्था आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेल या उपशाखांमध्ये केली. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठांपुढे ठेवताना गुन्हे शाखेतील मूळ रूजू दिनांक दाखवत नाहीत. उपशाखांमधील रूजू तारखेची माहिती देऊन वरिष्ठांनाही अंधारात ठेवले जाते. त्यामुळे ठाण्यांमध्ये दखलपात्र कामगिरी करणाऱ्यांना गुन्हे शाखेचा मार्ग कठीण होत आहे.
कार्यकाल संपल्यावरही ‘एलसीबी’तच ठाण !
By admin | Published: May 16, 2016 11:27 PM