शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

छत्रपती संभाजीनगरातील शून्य मैलाचा तो दगड गेला थरांच्या आड

By विकास राऊत | Published: January 11, 2024 7:59 PM

शून्य मैलाचा दगड शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात येतो.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शून्य मैलाचा दगड सिमेंट रस्ते आणि डांबरीकरणांच्या थराआड गेला आहे. मध्यवर्ती बसस्थानकालगत हा दगड सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविला होता. आता दगड सध्या असल्याचे दिसत नाही. नियमितपणे केले जाणारे डांबरीकरण किंवा रस्त्याचे मजबुतीकरण करण्यामुळे सदरील दगड थरांच्या आड गेला असेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत आहे.

स्थानकापासून विमानतळ, रेल्वेस्टेशन, ऐतिहासिक पर्यटनस्थळे किती किलोमीटरवर आहेत. याची माहिती त्या मैलाच्या दगडामुळे मिळणे शक्य आहे. आता गुगल मॅपवरूनच ठिकाण, अंतराची माहिती मिळविली जात आहे. त्यामुळे मैलाचे दगडही कमी प्रमाणात दिसत आहेत.

शून्य मैलाचा दगड कसा ठरतो?शून्य मैलाचा दगड शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात येतो. ५ ते १० कि.मी.च्या अंतरातील गाव, परिसर किती लांबवर आहेत. याची माहिती मिळावी, यासाठी तो दगड लावण्यात येताे.

कोठून किती अंतर?बसस्थानक ते रेल्वेस्टेशन : बसस्थानक ते रेल्वेस्टेशन हे अंतर ४.९ कि.मी. आहे. बसस्थानकातील शून्य कि.मी. दगडापासून हे अंतर घेतल्याचे बांधकाम विभाग सांगते.बसस्थानक ते विमानतळ : बसस्थानक ते विमानतळ हे अंतर ११ कि.मी. आहे. बसस्थानकापासूनच शहरातील सर्व ठिकाणचे अंतर काढण्यात येते.

शून्य मैलाचा दगड ठाऊक आहे का?शहरात असा दगड पाहण्यात नाही, परंतु नागपूरला असल्याची माहिती आहे.-प्रवीण इंगळे

शून्य मैलाचा दगड अलीकडच्या काळात पाहण्यात आलेला नाही.-बापू कवळे

आता गुगल मॅपवरूनच अंतर कुठे किती हे पाहिले जाते, त्यामुळे दगडांकडे कोण पाहते.-नितीन पाटील

शून्य मैलाचा दगड नागपूरमध्येशून्य मैलाचा दगड नागपूरमध्ये आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणापासून सर्व बाजूचे अंतर तेथूनच घेतले जाते. शहरात शून्य मैलाचा दगड असतो, असे काही ऐकिवात नाही. परंतु मध्यवर्ती बसस्थानक येथून सर्व ठिकाणचे अंतर काढले जाते. त्यामुळे तेथेच शून्य कि.मी.चे दगड असायचे. बसस्थानकापासूनच सगळे अंतर सध्या मोजले जाते.-विवेक बडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग