शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

परतीच्या पावसाचा धडाका, आवक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 7:34 PM

गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यास परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग आज सकाळपासून वाढविण्यात आला.

पैठण ( औरंगाबाद): नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी व प्रवरा नदीस पूर आल्याने ६१३५४ क्युसेक्स क्षमतेने या नद्याचे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. यामुळे आज जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने वर उचलून ७५९५६ क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीस पुर आला आहे. विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यास परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग आज सकाळपासून वाढविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणामधून  १०५६२ क्युसेक्स, कडवा ७६३२ क्युसेक्स, गंगापूर ४८१५ क्युसेक्स व नांदूरमधमेश्वर वेअर मधून ३८३४५ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा १३९८० क्युसेक्स, नीळवंडे १८९०४ क्युसेक्स, ओझर वेअर १६२८८ क्युसेक्स, मुळा १५००० क्युसेक्स व नेवासा केटी वेअर मधून २३००९ क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीत सुरू आहे. यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला असून गतीने पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. दरम्यान, आज सायंकाळी जायकवाडी धरणात ४०८५२ क्युसेक्स पाणी दाखल होत होते. धरणाचा जलसाठा ९८.६८% झाला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस