शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जेसीबीचा धक्का लागून जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह निखळला; शहरात निर्जळी!

By मुजीब देवणीकर | Published: April 06, 2023 2:59 PM

नवीन जलवाहिनी टाकताना फारोळा गावाजवळ जेसीबीचा धक्का १,२०० मिमी व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला लागला.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २,५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम जीव्हीपीआर कंपनीमार्फत सुरू आहे. जलवाहिनी टाकताना बुधवारी सायंकाळी फारोळा गावाजवळ जेसीबीचा धक्का १,२०० मिमी व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला लागला. त्यामुळे व्हॉल्व्ह निखळून २५ ते ३० फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. जलवाहिनी त्वरित रिकामी करून मनपाने दुरुस्तीचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू राहिल्याने आज शहरात पाणीपुरवठा होणार नाही, असे मनपाकडून कळविण्यात आले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणताही खंड पडून देणार नाही, उपलब्ध पाण्यावरच नागरिकांची तहान भागविण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सकाळी पत्रकारांना सांगितले. सायंकाळी मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. फारोळा गावाजवळ बुधवारी जलवाहिनी टाकण्यात येत होती. ज्याठिकाणी ही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते त्या जागेला लागूनच १,२०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी १,४०० मिलीमीटरचा पाइप होता. १,४०० मिलीमीटरच्या पाइपला धक्का लागला आणि हा पाइप एअर व्हॉल्व्हवर पडला. त्यामुळे एअर व्हॉल्व्ह फुटला, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. एअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे त्यातून २५ ते ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडू लागले. सुमारे एक ते दीड तास हे फवारे उडत होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. फुटलेल्या एअर व्हॉल्व्हची जलवाहिनी पूर्णपणे रिकामी झाल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीसाठी किमान सात तास लागतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पाणीपुरवठा लांबणीवरशहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. एक दिवसाने पुरवठा पुढे ढकलण्यात आला. गुरुवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे, त्या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होईल. मनपाकडून शक्य झाल्यास गुरुवारी कमी दाबाने पाणी देण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यातील विघ्न२३ जानेवारी- फारोळ्यात मोठे लिकेज.०१ फेब्रुवारी- नाथ सीड्सजवळ जलवाहिनी फुटली.०६ मार्च- वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित.०७ मार्च- पंपिंग अचानक बंद पडले.०७ मार्च- वादळी वाऱ्याचा फटका.२७ मार्च- फिडरमध्ये मोठा बिघाड.३० मार्च- पंपात बॅक वॉटर शिरले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी