शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

By सुमित डोळे | Updated: August 3, 2024 14:35 IST

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचे वाद सोडवून त्यांना पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आणण्याची जबाबदारी असलेला ‘भरोसा सेल’चा आता एकाकी पडला आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळ राहणाऱ्या या कार्यालयात आता स्मशान शांतता पाहायला मिळत आहे. अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर चालणारा या भरोसा सेलचा आता ‘भरोसा’च उरला नसण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी २०१७ मध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने भरोसा सेल संकल्पनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक शहर व जिल्हास्तरावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयात हा सेल सुरू करण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेणे बंधनकारक असून स्वतंत्र दालन, कर्मचारी व समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. किरकोळ कारणातूनही पती-पत्नीमध्ये घटस्फोट, विभक्त होण्यासह एकमेकांना गंभीर मारहाण करण्यापर्यंत वाद पोहोचतात. समुपदेशनानंतरही समाधान न झाल्यास अखेर प्रकरण न्यायालय किंवा पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात येते. वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस अधिकारी यात समुपदेशन करुन दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करतात.

कौटुंबिक कलहांत वाढचार वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२१मध्ये कौटुंबिक वादाच्या २,०६७ तक्रारींपैकी केवळ ४४१ प्रकरणांत समझोत्यासाठी पोलिसांना यश आले, तर २०२४च्या चार महिन्यांमध्येच शहरात ५४६ पती-पत्नीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले.

वर्षे - तक्रारी -समझोता२०२१ -२०६७ -४४१२०२२ - २२२६ -५१०२०२३ -१८७३ -३८३२०२४ -५४६ २०९

वर्षे -कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे२०२० -२०६२०२१ -२८८२०२२ -२७३२०२३ -२४९

दुपारी ३ला विभाग बंद-सिल्लेखाना परिसरात शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’साठी मनपाच्या इमारतीत स्वतंत्र मजला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतंत्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचारी व समुपदेशक येथे कार्यरत होते.-गेल्या काही दिवसांपासून मात्र केवळ २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.-सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणारा विभाग आता दुपारी ३ वाजताच बंद होतो, हे विशेष.

पोलिस भरती, सेवानिवृत्ती तर बदली-गुरुवारी दुपारी २:३० वाजता विभागाची पाहणी केली असता दोन समुपदेशक महिला तर एक पोलिस कर्मचारी विभागात होते. बाहेर तक्रारदार प्रतीक्षेत बसले होते. दिवसाला किमान २० तक्रारदार असतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी देखील तेथे कोणी उपस्थित नसते.-यातील एक कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. एका कर्मचाऱ्याची बदली झाली तर उर्वरित सर्व कर्मचारी पोलिस भरतीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांना मात्र पोलिस विभागाच्या या अती ‘व्यस्ततेचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद