औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित नर्सशी शारीरिक संबंध ठेवून दोन वेळा तिचा गर्भपात करून फरार झालेला आरोपी नागेश उर्फ नागोराव अशोकराव पोले (रा.व्यंकटेशनगर) याला जवाहरनगर पोलिसांनी महिन्याभरानंतर गुरुवारी अटक केली. आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी दिले.
काय आहे प्रकरण३० वर्षांच्या नर्सने फिर्याद दिल्यानुसार तिचा विवाह झाला असून, तिला एक मुलगा आहे. २०१५ ते २०१९ दरम्यान ती आरोपीच्या काकाच्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती. हॉस्पिटलमध्येच त्यांची ओळख झाली. त्यानंतर, ते फोनवर परस्परांच्या संपर्कात होते. याबाबत तिच्या पतीला समजले. त्याने दोघांना समजावून सांगितले. त्यानंतर, वर्षभर तिने आरोपीसोबत बोलणे बंद केले. मात्र, आरोपी तिला वारंवार फोन करत असे. फिर्यादी त्याकडे दुर्लक्ष करीत होती. नोव्हेंबर, २०१९ मध्ये फिर्यादीच्या कुटुंबात घरगुती वाद झाला. डिसेंबर, २०१९ पासून फिर्यादी रूम करून एकटी राहू लागली.
पुन्हा आरोपीशी संपर्क वाढलात्यामुळे दोघांत पुन्हा संपर्क वाढला. तो तिच्या रूमवर राहू लागला. त्याने लग्नाचे आमिष दाखवून २ वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मार्च आणि ऑक्टोबर, २०२० मध्ये फिर्यादी दोन वेळा गर्भवती राहिली. आरोपीने एकदा खासगी दवाखान्यात आणि एकदा घरी किट आणून गर्भपात केला. १२ मार्च रोजी आरोपीने फिर्यादीशी वाद घालून लग्न करण्यास नकार दिला व फोन बंद करून निघून गेला होता.
आरोपीला नाशिकमधून अटकपोलिसांनी आरोपीला जानता राजा कॉलनी (मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) येथून अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल हस्तगत करायचा असल्याने, त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.