शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 11:56 AM

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली.

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा पेपर चांगला गेल्यामुळे वडील, मुलगा व बहिणीने बाहेर जाऊन एकत्र आइस्क्रीम खाल्ले. त्यानंतर तिघेही घरी आले. वडील, बहीण झाेपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातील चारचाकी गाडी बाहेर काढली. ती घेऊन क्रांती चौकाकडून सिडकोकडे जाताना नियंत्रण सुटल्यामुळे एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलावर आदळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १.५५ मिनिटांनी घडली. याच ठिकाणी सात वर्षांपूर्वी त्याच्या आईचाही दुचाकीने उडविल्यामुळे मृत्यू झाला होता, अशी माहिती जिन्सी पोलिसांनी दिली.

सोहम नीरज नवले (१७, रा. इस्सार पेट्रोल पंपाजवळ, गजानन मंदिर परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहम हा शहरातील वंडर गार्डन शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याने पहिला पेपरही दिला. त्याला कार चालविता येत नव्हती; परंतु त्याला कार शिकायची होती. गुरुवारी रात्री तो वडील व बहीण सईसोबत कॅनॉट परिसरात आइस्क्रीम खाण्यासाठी गेला. ते रात्री ११ वाजता घरी परतले व झोपी गेले. मात्र मध्यरात्रीनंतर सोहम गुपचूप पार्किंगमध्ये लावलेली कार (एमएच २० वाय ६८१९) घेऊन बाहेर पडला. काही वेळाने वडील बाहेर आले असता दरवाजा उघडा दिसला. त्यांनी सोहमच्या रूममध्ये जाऊन बघितले असता तो नव्हता. बाहेर पाहिल्यावर कारपण नव्हती. त्यामुळे त्यांनी मुलीकडे चौकशी केली. तिला काही माहिती नसल्याने दोघे सोहमच्या शोधात दुचाकीवर निघाले. मात्र इकडे सोहम भरधाव कार चालवीत असताना एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलास धडकला आणि ठार झाला. या प्रकरणी सोहमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याच विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

...अन् कार मध्यभागातून चिरलीक्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. तेव्हा मोठा आवाज आला. या धडकेत कार अर्ध्यातूनच चिरली. त्याचे काही भाग रस्ता ओलांडून पलीकडे फेकले गेले. घटनेची माहिती समजताच नाईट ड्युटीला असणारे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, जिन्सीच्या उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार बाजूला केली. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.

सात वर्षांपूर्वी याच ठिकाणीनिरज नवले हे प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचा एसएफएस शाळेजवळच सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीने उडविल्याने अपघातात मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सोहम हा एकुलता मुलगा होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद