शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ

By साहेबराव हिवराळे | Published: June 06, 2023 6:44 PM

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूखंडांवर एक नव्हे तर पाच-पाच मजली इमारती उभा राहिल्या खऱ्या; पण ज्या कारणास्तव महानगरपालिकेत गेल्यावर पाणी तत्काळ तसेच इतर सेवासुविधा मिळतील, अशी आशा होती, त्या अद्यापही पदरी न पडल्याने सातारा परिसराची जुनी ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची रहिवाशांवर वेळ आली आहे.

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

मनपाने अधिक लक्ष देण्याची गरजसमाजकल्याण विभाग, आदिवासी वसतिगृह असून, पोस्ट कार्यालय तसेच महावितरण कार्यालयदेखील आहे. मनपाने आरोग्य केंद्र देखील सुरू केलेले आहे. दवाखाने, शैक्षणिक संस्थादेखील असून, मोठमोठाली मंगल कार्यालये असल्याने परिसर नावारूपाला आलेला आहे. परंतु, पाणीपुरवठा कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवकजिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता पाहता येथील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढलेलीच आहे. खासगी शाळांनाही लाजवेल अशी गुणवत्ता टिकून ठेवलेली असल्याने पालकही खूश आहेत. बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक वळल्याचे दिसते.- जमील पटेल

मंदिरामुळे अनेकांना रोजगारखंडोबा मंदिरामुळे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पाने फुले, हळदी-कुंकू, रेवड्या विक्रीतून बऱ्यापैकी व्यवसाय सुरू आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम शासनाकडून सुरू आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, कडूबा शिराणे यांनी केली आहे.

पुलाखालून रस्ता कधी होणार?तिन्ही पूल प्रशासनाने तयार केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पावसाळ्यात पुलाखालून वाहने चालविणे किंवा वसाहतीची कनेक्टिव्हिटी कशी राहील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम गतीने पूर्ण करावे.- फिरोज पटेल, माजी सरपंच

दलित वसाहतीला १२ एप्रिलनंतर पाणीच नाहीमनपाच्या सार्वजनिक विहिरीतून जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सातारा गावात आणि दलित वसाहतीत केला जातो. १२ एप्रिलनंतर पाणीपुरवठाच झालेला नाही.- अनिल जाधव

वीजपुरवठा कधीही खंडितसातारा परिसरातील वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. फ्यूज कॉल सेंटरवरही फोन उचलत नाहीत. याबाबत पूर्वसूचना त्वरित ग्राहकांना देणे गरजेचे आहे.- आबा चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका