- दादासाहेब गलांडेपैठण : मागील २५ वर्षांपासून पैठण तालुका हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. या मतदारसंघाचे तब्बल २५ वर्षे आमदार म्हणून जिल्ह्याचे विद्यमान खासदार संदिपान भुमरे हे राहिलेले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे तालुक्यातील बाळासाहेब ठाकरेंचा मूळ शिवसैनिक कोणासोबत जातो, हे या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही बरेच अवलंबून आहे. तर ओबीसी उमेदवारही वंचितकडून लढण्याची शक्यता आहे.
पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तालुक्यात ३ लाख ८ हजार ६९८ मतदार आहेत. मागील निवडणुकीत संदिपान भुमरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून दत्तात्रय गोर्डे लढले होते. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. मागील पाच वर्षांपासून तालुक्यात भुमरे विरुद्ध गोर्डे संघर्ष सुरू आहे. तालुक्यात भाजपला जागा न सुटल्यास भाजपमधून बंडखोरी करून विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढण्याची शक्यता डॉ. सुनील शिंदे यांची आहे. तर शिंदेसेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा चेअरमन विलास भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उद्धवसेनेकडून दत्तात्रय गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे तर सचिन घायाळ यांनी उद्धव ठाकरे यांना मतदारसंघात आणून शक्तिप्रदर्शन केलेले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वाघचौरे, शेळके इच्छुकराष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार संजय वाघचौरे व विलास शेळके हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर अजित पवार गटाकडून आप्पासाहेब निर्मळ, काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल पटेल, रवींद्र काळे, तालुकाप्रमुख विनोद तांबे, कांचनकुमार चाटे हे सुद्धा इच्छुक आहेत. वंचित आघाडीकडून प्रकाश दिलवाले, तर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केल्यास पवन शिसोदे, माऊली मुळे लढण्याची शक्यता आहे.
२०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते :१ ) संदिपान आसाराम भुमरे पाटील - ८३४०३ -३९.११ टक्के२ ) दत्तात्रय गोरडे पाटील - ६९२६४ - ३२.४८ टक्के३ ) विजय अंबादास चव्हाण - २०६५४