शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला

By विजय सरवदे | Published: June 13, 2024 3:10 PM

संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या शक्तीला दूर ठेवण्याची मानसिकता आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांची होती.

छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा खासदार निवडून आणणारी वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक यावेळी मात्र, मोठ्या प्रमाणात विखुरली. या निवडणुकीत ‘वंचित’ची केवळ ३० ते ३५ हजारच मते अफसर खान यांना मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले, तर उरलेली सुमारे एक ते दीड लाख मते इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे आणि थोडेफार अपक्ष उमेदवारांच्या पारड्यात पडली. असा प्रकार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातच नाही, तर राज्यातील ‘वंचित’ने उभे केलेल्या ३५ मतदारसंघात दिसून आला. 

असे का घडले, याचे कारण म्हणजे, संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या शक्तीला दूर ठेवण्याची मानसिकता आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांची होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने याच मुद्यावर निवडणूक लढली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनीमहाविकास आघाडीसोबत जावे, अशी वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची मनोमन इच्छा होती. परंतु, आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. हे आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांना फारसे रुचले नाही. शिवाय, ‘वंचित’ने उभे केलेला उमेदवारही मतदारांच्या पसंतीस फारसा उतरलेला नव्हता. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’च्या मतदारांनी एक तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात मते टाकली, तर शिक्षित व पुरोगामी चेहरा म्हणून पुनश्च एकदा इम्तियाज जलील यांचा पर्याय स्वीकारल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. या निवडणुकीत ‘वंचित’चे उमेदवार अफसर खान यांना ६९ हजार २६६ एवढी मते मिळाली, तर चंद्रकांत खैरे यांना २ लाख ९३ हजार ४५० आणि इम्तियाज जलील यांना ३ लाख ४१ हजार ४८० मते मिळाली आहेत.

‘वंचित’चा करिश्मा चालला नाहीगेल्या निवडणुकीत ‘वंचित’चे अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा ‘वंचित’मुळे फार कमी मतांनी पराभव झाला होता. ही भीती यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकरांसाठी आघाडीचे दार उघडे ठेवले होते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघितले, तर ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही, असेच एकंदरित चित्र निकालावरून दिसून येते.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahavikas Aghadiमहाविकास आघाडी