शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
2
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
3
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
4
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
6
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
7
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
8
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
9
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
10
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
11
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
12
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
13
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
14
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
15
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
16
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
17
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
18
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
19
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
20
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

नाशिक, अहमदनगरचा विरोध; जायकवाडीत पाणी सोडण्यावर आज बोलणार मुख्यमंत्री शिंदे

By विकास राऊत | Published: November 20, 2023 12:28 PM

महसूल मंत्री म्हणाले, मराठवाड्याने आमची अडचणही समजून घ्यावी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडीत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर सोमवारी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवांच्या विवाहसोळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली.बीडबायपास येथील एका लॉनवर झालेल्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे आले असता जायकवाडीत पाणी सोडण्यावर प्रश्न केल्यावर सोमवारी यावर बोलेल, असे सांगितले.

यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अबू आझमी, माजी आ. अर्जुन खोतकर यांच्यासह जलसंधारण सचिव सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, तहसिलदार विजय चव्हाण व काही सनदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सायंकाळी ८ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त आर्दड यांच्यासह मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आदींची उपस्थिती होती.

महसूल मंत्री विखे काय म्हणाले...महसूल मंत्री विखे म्हणाले, यंदा जायकवाडीवरील धरणांची अवस्था देखील बिकट आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्याने देखील बाजू समजून घेतली पाहिजे. या सगळ्या परिस्थितीवर योग्य मार्ग काढता येईल. दोन्ही भागातील शेतकरी आपलेच आहेत. मराठवाड्यातील बांधवांनी यंदा पाणी सोडण्याचा आग्रह करू नये, असा विनंती करणारा ठराव केला आहे. पाणी सोडू नये, ही भूमिका नाही. कायदेशीररीत्या निर्णय घेऊ.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी जेवणाचा घेतला आस्वादमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, जलसंधारण मंत्री राठोड, पणनमंत्री सत्तार, महसूल मंत्री विखे यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.

भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी....अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही विवाह सोहळ्याला हजेरी लावली. ते परतत असताना गर्दीमधून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षण प्रकरणावरून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाची त्या घोषणाबाजीला किनार होती. मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच भुजबळ हे विवाहस्थळावरून गेले. तत्पूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील येऊन गेले.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद