शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

काऊंटडाऊन सुरू; कोण येणार? महायुती, महाविकास आघाडी अन् एमआयएममध्ये रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 11:22 AM

महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार, असे दावे करून विजयी होण्याचा आवाज चढविला आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला चार दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार, असे दावे करून विजयी होण्याचा आवाज चढविला आहे. १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर ४ जून रोजीच्या निकालाची उत्सुकता राजकीय वर्तुळासह मतदारांना लागली आहे. सगळ्याच पक्षाचे धुरीण यावेळी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाचे अवलोकन कसे करावे, या विवंचनेत आहेत. कुणालाही ठामपणे आपलाच विजय होणार, हे सांगणे अवघड आहे. परंतु मतदानाच्या २० दिवसांनंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर आढावा घेतल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएममध्ये विजयासाठी जाेरदार रस्सीखेच होणार असल्याचे संकेत आहेत. ३७ उमेदवार आणि नोटा मिळून ३८ जणांमध्ये मतांची विभागणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपा, अपक्षांनी घेतलेली मते कुणाच्या पराभवाला कारणीभूत ठरणार, हे ४ जून रोजी स्पष्ट होईल.

२२ टक्के मते आघाडीलामहाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, मुस्लिमांची २२ टक्के मते आपल्याला मिळाली आहेत. त्याशिवाय इतर मते देखील मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होईल.

खासदार महायुतीचाचशिवसेना-भाजपा व इतर पक्षांसह असलेल्या महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दावा केला की, खासदार महायुतीचाच होईल. शहरी व ग्रामीण मतदारांनी हिंदुत्वाच्या बाजूनेच कौल दिला, हे निकालात कळेलच.

आम्ही परिश्रम घेतलेएमआयएमचे उमेदवार खा.इम्तियाज जलील यांनी दावा केला की, आम्ही मेहनत केली आहे. त्यामुळे आम्हाला निकाल काय लागणार, याची चिंता नाही. आम्ही सकारात्मक विचाराने निवडणूक लढलो.

तर विधानसभेच्या उमेदवारीवर गंडांतरभाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ४ जूनच्या निकालापूर्वी भाजप आमदार असलेल्या सर्व मतदारसंघातून अहवाल मागविले आहेत. कोणत्या मतदारसंघातून किती मताधिक्य मिळणार, याचा दावा आमदारांनी केला आहे. त्या दाव्यावर कसोटीने आमदार उतरले नाहीत. तर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणे अवघड जाईल. ४ जूनच्या निकालापूर्वीचे दावे आणि मतमोजणीनंतर मिळालेली मते याचे विश्लेषण पक्ष पातळीवर होणार आहे. जिल्ह्यांत औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत.

मतदारसंघनिहाय किती मतदान?कन्नड : २ लाख १७ हजार ८९औरंगाबाद मध्य : २ लाख ११ हजार ५००औरंगाबाद पश्चिम : २ लाख ३५ हजार ७८४औरंगाबाद पूर्व : २ लाख ६ हजार ६३३ मतदानगंगापूर : २ लाख २७ हजार १५२वैजापूर : २ लाख ८८२एकूण : १२ लाख ९९ हजार ४०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४aurangabad-pcऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४