शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

सावधान! पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सॲप पिंक व्हायरस; इन्स्टॉल करताच मोबाइल होईल हॅक

By सुमित डोळे | Published: June 15, 2023 12:02 PM

व्हॉट्सॲपचा हिरवा रंग बदलून गुलाबी रंगात बदलतो, असे सांगून वापरकर्त्यांना आकर्षित केले जाते.

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी इंटरनेट जगतात धुमाकूळ घातलेला 'व्हॉट्स ॲप पिंक' व्हायरस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. व्हायरल होणाऱ्या लिंकमधून व्हॉट्स ॲपचे नवे व्हर्जन इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते व क्षणार्धात सायबर गुन्हेगार तुमचा मोबाइलच हॅक करतात. राज्यभरात गेल्या दोन दिवसांमध्ये त्याच्या तक्रारी वाढत असताना शहरातही मंगळवारी एकाच दिवसात पाच जणांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

व्हॉट्स ॲपला सातत्याने अपडेट येतात. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून या व्हॉट्स ॲपच्या नवीन व्हर्जनची लिंक फॉरवर्ड होण्यास सुरुवात झाली आहे. यात ॲपचा हिरवा रंग बदलून गुलाबी रंगात बदलतो, असे सांगून वापरकर्त्यांना आकर्षित केले जाते. तज्ज्ञांच्या मते, एका विशिष्ट कालावधीनंतर अशा व्हॉट्स ॲप लिंक व्हायरल होत आहेत. परंतु त्या पूर्णपणे खोट्या आहेत. २०२१ मध्ये सर्वप्रथम 'व्हॉट्स ॲप पिंक' हा व्हायरस इंटरनेटच्या जगतात आला. तेव्हाही राज्यभरात हजारो नागरिक याला बळी पडले.

इन्स्टॉल केल्यास नेमके काय होते ?व्हॉट्स ॲप पिंक' लिंक सध्या फिरत आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करतानादेखील तुम्हाला त्याची जाहिरात प्राप्त होऊ शकते. त्यावर क्लिक करताच तेथून तुम्हाला लिंक अनोळखी संकेतस्थळावर घेऊन जात एपीके फाइल इन्स्टॉल करण्यास सांगते. त्याद्वारे ॲप/लिंक इन्स्टॉल होताच मोबाइलमधील संपर्क क्रमांक, फाइल मॅनेजर, व्हाॅइस, लोकेशनची परवानगी मागते. सहसा वापरकर्ते ते सर्व मान्य करत पुढे जातात व काही क्षणात तुमच्या मोबाइलचा ताबा पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या हाती जातो.

पोलिस, प्राध्यापक पडले बळीशहर सायबर पोलिसांकडे या व्हायरसला बळी पडलेल्या पाच ते सहा जणांनी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे यात एक पोलिस कर्मचारी असून दुसरे विद्यापीठातील प्राध्यापकाचा समावेश आहे. त्यांनी वेळीच सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने तक्रारीची दखल घेत पुढील नुकसान टळल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.

तुमच्या माहितीचा अनेक मार्गाने होतो वापर :- मोबाईलमधील संपर्क क्रमांक, त्यातील होणाऱ्या चर्चा, ग्रुपचे नावे आदी माहिती डेटा म्हणुन वापरला जातो. तो सायबर जगतात लाखो रुपयांना विकला जातो.-मोबाईल हॅक केल्यानंतर तुम्ही करत असलेले ऑनलाईन व्यवहार हेरून पैसे लंपास केले जाऊ शकतात.-बदनामीसाठी हे प्रयोग होतात. त्यातून तुमच्या नावाने कुठलाही गैरप्रकार, चुकीचे मेसेज पाठवले जातात.-कुठलेही ॲप इंस्टाॅल करताना ते मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमच्या अधिकृत ॲपमधूनच इंस्टॉल करा. त्याच्या खालील त्याचा रिव्ह्युव्हज आवर्जुन वाचा.

चूक झाल्यास तत्काळ हे करा :सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,-चुकून असे ॲप, लिंक इंस्टॉल झाल्यास तत्काळ ते ॲप अनइन्स्टॉल करा, व्हॉट्स ॲप पिंक ॲप हे हाईड होऊन जाते.-ते हाईड झाल्यास मोबाईल सेटिंग-ॲप्स या पर्यायात जाऊन या नावाचे ॲप काढून टाका.-सर्व ॲपला दिलेल्या परवानग्या (परमिशन) रिमूव्ह करा.-सेटिंगमध्ये जाऊन ब्राऊजर कॅचे क्लिअर करा.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी