शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निर्णय प्रती हेक्टर पाच हजारांच्या अनुदानाचा अन् प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार रुपये अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:54 IST

कापूस, सोयाबीन अनुदान : शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदानापासून वंचित

छत्रपती संभाजीनगर : कापूस आणि साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. प्रत्यक्षात मात्र प्रति हेक्टर चार हजार रुपये याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पेऱ्याची ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवर नोंद केली, त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची अट राज्य सरकारने घातली. यामुळे राज्यातील ५० टक्के कापूस आणि साेयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. पीक पेरा नोंद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकतेच राज्य सरकारने अनुदान अदा केले. हे अनुदान मात्र घोषणेनुसार प्रती हेक्टरी पाच हजार ऐवजी चार हजार रुपये याप्रमाणे अदा करण्यात आले आहे. दोन हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जास्तीत जास्त आठ हजार रुपये देण्यात आले आहे.

३७ हजार शेतकरी अनुदानापासून वंचितअनुदान मिळविण्यासाठी संयुक्त खातेदार शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या बॉण्डपेपरवर शपथपत्र देणेही बंधनकारक करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे २७ हजार संयुक्त खातेदार शेतकरी आहेत. यातील केवळ आठ हजार शेतकऱ्यांनीच शपथपत्र दिल्याने त्यांना अनुदान मिळाले. उर्वरित १९ हजार शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांमध्ये मृत, अल्पवयीन खातेदारांचा समावेश आहे. यामुळे त्यांना अनुदान अदा करता आले नसल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र