शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:26 PM

उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे अंतर सारखेच आहे. रेल्वेही एकच; पण मुंबईला जाताना कमी आणि मुंबईहून शहरात परत येण्यासाठी १५० रुपये जास्त  मोजण्याची वेळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर येत आहे. तिकीट दरात हा फरक का, असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.

उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली. या पहिल्या रेल्वेतून मुंबई ते जालनादरम्यान ३०६ प्रवाशांनी प्रवास केला. या रेल्वेची ५३० आसन क्षमता आहे. जालन्याहून मंगळवारी ही रेल्वे पहिल्यांदा प्रवाशांना घेऊन धावणार आहे. 

असा आहे तिकिटातील फरक- मार्ग- चेअर कार (सीसी)- एक्झिक्युटिव्ह क्लास (इसी)- छत्रपती संभाजीनगर ते मुंबई - १,०२५ रुपये - १,९३० रुपये- मुंबई ते छत्रपती संभाजीनगर - १,१७५ रुपये - २,११० रुपये

वेटिंग १० वर -- ही पहिलीच रेल्वे प्रवाशांनी ‘हाउसफुल’ झाली असून, सोमवारी रात्री ८ वाजता चेअर कारचे (सीसी) वेटिंग ४९ वर होते, तर ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासचे (इसी) वेटिंग १० वर होते. -  वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या रेल्वेच्या तिकीट दरांविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. - याच रेल्वेने मुंबईहून येताना चेअर कारसाठी (सीसी)१५० रुपये  आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लाससाठी (इसी) १८० रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे