शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मोठी बातमी! टोयोटानंतर छत्रपती संभाजीनगरात जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प

By बापू सोळुंके | Published: October 10, 2024 6:58 PM

बिडकीन डिएमआयसीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प आल्याने उद्योजगतात उत्साहाचे वातावरण, ऑरिक सिटीने दिले जमिन देयपत्र

छत्रपती संभाजीनगर: इलेक्ट्रीक कार आणि कमर्शियल व्हेईकल उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनी  छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटीच्या बिडकीन डिएमआयसी मध्ये ६३६एकर जमिन प्रकल्प उभारणार आहे. कंपनीच्या मागणीनुसार गुरूवारी ऑरिक प्रशासनाने कंपनीला जमीन देय पत्र दिले. ही कंपनी येथे तब्बल २७ हजार २००कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीमुळे प्रत्यक्ष ५हजार २००  आणि अप्रत्यक्ष १५ हजार असे एकूण २० हजार २०० रोजगार  उपलब्ध होणार आहे.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणूकींचा ओघ वाढला आहे. राज्यसरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आलेल्या टोयोटा- किर्लोस्कर, एथर एनर्जी, लुब्रिझोल या कंपन्यांनी एकापाठोपाठ गुंतवणूक करीत जमिन घेतली. या कंपन्यासोबतच जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीने ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासंदंर्भात राज्यसरकारसोबत सामंजस्य करार केला होता. या करारानंतर कंपनीचे अधिकारी आणि राज्यसरकार यांच्यात चर्चेच्या यशस्वी फेऱ्या झाल्या. उद्योग उभारण्यासाठी सर्वाधिक चांगले वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे लक्षात येताच कंपनीने ऑरिक सिटीकडे अर्ज करून ६३६एकर जमिनीची मागणी केली होती. 

यानंतर कंपनीने एकूण जमिनीच्या किंमतीच्या ५ टक्के रक्कम ऑरिक प्रशासनाकडे अदा केली होती. कंपनीच्या मागणीनुसार  बिडकीन डिएमआयसी मध्ये ५४६ एकर आणि ९० एकर असे एकूण दोन  भूखंडाचे  देयकार पत्र गुरूवारी प्रदान करण्यात आल्याची माहिती ऑरिकचे व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली. जेएसडब्ल्यू   बिडकीन डिएमआयसीमध्ये इलेक्ट्रीक कार आणि कमर्शियल व्हेईकल उत्पादन करणार आहे. यासाठी कंपनी येथे २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपनीमुळे प्रत्यक्ष ५ हजार २०० आणि अप्रत्यक्ष १५ हजार असे एकूण २० हजार २०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ऑरिककडून सांगण्यात आले. 

टोयोटा, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीमुळे मराठवाड्याचे अर्थकारण बदलणारटोयोटा- किर्लोस्कर, अथर आणि लुब्रिझोल कंपन्यांनी बिडकीन डिएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्या पाठोपाठ आता इलेक्ट्रीक कार आणि कमर्शियल व्हेईकल उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीने जमिनीची मागणी केल्याने मराठवाड्यातील उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये यावे, यासाठी राज्यशासनासोबतच सीएमआयएच्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी विशेष पाठपुरावा केला. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर