शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

हिंदुत्व आणि गुंठेवारीच्या मुद्द्यावर लढली गेली ‘औरंगाबाद पश्चिम’ची निवडणूक, विजय कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:58 IST

१८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी पार पडलेली निवडणूक सातारा परिसरातील गुंठेवारीचा प्रश्न आणि हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढविण्यात आल्याचे दिसून आले. या मतदारसंघातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

मतदान प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी उद्धवसेनेचे राजू शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे. त्यांच्यापैकी कोणाचा दावा खरा ठरतो हे २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांना शिंदेसेनेने औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली होती. पक्ष फुटीपासून आमदार संजय शिरसाट कायम उद्धवसेनेवर तोंडसुख घेत आले आहेत. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने राजू शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. यासोबत वंचितचे अंजन साळवे आणि रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे रमेश गायकवाड यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. पश्चिममध्ये मात्र खरी लढत या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच झाल्याचे दिसून आले. पश्चिमची निवडणूक ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढली गेली. उद्धवसेनेचे हिंदुत्व खोटे आहे. उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान असा दावा आ. शिरसाट यांनी केला होता. शिंदे यांनी पश्चिममधील सातारा, देवळाईच्या गुंठेवारी प्रश्नासह मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला. उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट या दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे.

वाढलेला मतदान टक्का शिंदे यांच्या पथ्यावरसन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५९.५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कालच्या निवडणुकीत ६०.५८ टक्के मतदान झाले होते. गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला १ टक्का मतदान कोणाच्या पारड्यात पडते हे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीत स्पष्ट होईल.

मला ४० ते ५० हजार मतांची आघाडीपश्चिम मतदारसंघातील आमदाराला कंटाळलेल्या सुज्ञ मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान केल्याने त्यांना धन्यवाद देतो. या निवडणुकीत आपण प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ४० ते ५० हजार मतांची आघाडी घेऊन विजयी होणार आहे. आता फक्त २३ नोव्हेंबर रोजी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.- राजू शिंदे. उद्धवसेना उमेदवार

२० ते २५ हजारांच्या लीडने विजय होईलपश्चिम मतदारसंघातील शिवसेना, भाजप विचाराच्या लोकांनी तसेच दलित समाजातील मंडळींनी आपल्याला मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत. २० ते २५ हजारांची लीड घेऊन आपण विजयी होऊ. धावपळीतून आज थोडा निवांत झालो, तरी दुपारपर्यंत कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांना भेटलो. नागरिकांची कामे केली.- आमदार संजय शिरसाट, शिंदेसेना उमेदवार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम