शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

खवय्यांसाठी आनंदाची बातमी, लसणाचे भाव घटल्याने फोडणीला आला सुगंध

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 28, 2024 5:54 PM

आता खमंग पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दालफ्राय असो वा भाजी किंवा वरण फोडणीत लसूण टाकून झणझणीत तडका दिला जातो. तेव्हा त्याचा दरवळ सर्वत्र पसरतो अन् चवही खमंग लागते. मात्र, मागील काही महिन्यांत लसूण महाग झाल्याने चव गायब झाली होती. पण, आता नवीन लसूण बाजारात आल्यामुळे त्याचा दर कमी होतोय अन् फोडणीचा गायब झालेला दरवळही पुन्हा घरघरांतून येऊ लागला आहे.

भाजी चमचमीत होण्यासाठी फोडणी दिली जाते. त्यात तेल, मोहरी, जिरा, कडीपत्ता, मिरची, हिंगाचा वापर केला जातो. याशिवाय त्यात लसणाची भूमिकाही महत्त्वाची असते. लसणाशिवाय फोडणी अशक्य. आता खमंग पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. यामुळे ६०० रुपये किलोने विक्री होणारा गावरान लसूण आता ४०० रुपयांना मिळू लागला आहे. हायब्रीड लसूनही ४०० रुपयांनी कमी होऊन २०० रुपये किलोने विकला जात आहे. भाव कमी झाल्याने भाजीमंडईत लसणाची मागणी वाढली आहे. भाजीखरेदीसाठी आलेला ग्राहक अर्धा किलो लसूण सहज खरेदी करीत आहे. एकट्या औरंगपुरा भाजीमंडईत दिवसभरात दीड ते दोन क्विंटल लसणाची विक्री होत असल्याची माहिती विक्रेते संजय वाघमारे यांनी दिली.

कुठून येतोय लसूणसध्या बाजारात मध्य प्रदेशातून लसणाची आवक होत आहे. जाधववाडी परिसरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १०५ ते १२५ क्विंटल लसणाची आवक होत आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकरीही काही प्रमाणात लसूण विक्रीला आणत आहे.

पन्हेसाठी कैरी भाजीमंडईतउन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंडगार पन्हे पिले जाते. यासाठी कैऱ्या भाजीमंडईत येऊ लागल्या आहेत. जसजशी कैऱ्यांची आवक वाढत आहे, तसतसे भावही कमी होत आहे. मागील महिन्यात १५० रुपये किलोने विक्री झालेली कैरी आता १०० रुपये किलोने ग्राहक खरेदी करीत आहेत. गूळ घालून कैरीचे पन्हे केले जाते, शिवाय बारीक फोडी करून इन्स्टंट लोणचेही केले जाते. गूळ घालून केलेले लोणचे चवदार लागते. कृउबा समितीत दररोज ५० क्विंटल कैरीची आवक होत असल्याची माहिती विक्रेते सागर पुंड यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfoodअन्नAurangabadऔरंगाबाद