शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

शेतकऱ्यांना वाटलं पिकात लपलेल्या बिबट्याने त्यांना पाहिलं नाही,ते माघारी फिरले आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 9:09 PM

तलाववाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

करंजखेड (औरंगाबाद) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, एक कुत्रा ठार झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी कन्नड तालुक्यातील तलाववाडी येथे घडली. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

करंजखेडजवळ असलेल्या तलाववाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान शेतकरी गजानन श्यामलाल राजपूत हे जनावरांसाठी बाजरीचा हिरवा कडबा आणण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना त्याठिकाणी बिबट्या लपलेला आढळला. त्यांनी लागलीच शेताशेजारील राहुल नारायण राजपूत यांना बोलावून घेतले. ते धावतच तेथे आले. दोघांनी तो बिबट्याच असल्याची खात्री केली. यानंतर त्यांनी तातडीने मोबाइलमध्ये फोटो काढून तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात बिबट्याने अचानक दोघांवरही हल्ला चढविला. दोघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. हे पाहून बिबट्याने जंगलात धूम ठोकली. तत्पूर्वी, त्याने एका कुत्र्यालाही ठार मारले. यात राहुल राजपूत व गजानन राजपूत यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

अधिकारी तातडीने घटनास्थळी...येथील ग्रामस्थ व शिवसेना जिल्हा उपप्रमुख अवचितराव वळवळे यांनी घटनेची माहिती वन विभागाला कळविली. कन्नड वनक्षेत्रपाल ए.बी. गायके, वन मंडळ अधिकारी नितीन घोडके, वनरक्षक आर.सी. म्हस्के, सी.एस. मुंजाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेने घाबरलेल्या गावकऱ्यांना धीर दिला, तसेच शेतकऱ्यांनी किमान दोन ते तीन दिवस त्या भागाकडे न जाण्याचा सल्ला दिला. एकटे बाहेर न पडणे, मोठ्याने आवाज करणे, फटाके फोडणे व धूर करण्याचा शेतकऱ्यांना त्यांनी सल्ला दिला.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी