शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:08 PM

पहिला प्रयत्न फसूनही चोरांकडून दूरवर पाठलाग, लिंक रोड मार्गे शहराबाहेर

छत्रपती संभाजीनगर : बाबा चौकातील आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढून निघालेल्या व्यावसायिक नवाब जमीर खान पठाण यांची तीन लाख रुपयांची बॅग चोरांनी लंपास केली. सोमवारी दुपारी तीन वाजता क्रांती चौकात ही घटना घडली. रात्री उशिरा याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पठाण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. सोमवारी ते दुचाकीने बँकेत गेले. तीन वाजता तीन लाख रुपये घेऊन ते दुचाकीने घराच्या दिशेने निघाले. मात्र, क्रांती चौकात जाताच दुचाकीचे चाक पंक्चर झाले. बँकेपासूनच चोर त्यांचा पाठलाग करत होते. क्रांती चौकातील पेट्रोलपंपावर पंक्चर काढण्यासाठी थांबल्यावर चोरटे बॅग लंपास करून सुसाट पसार झाले. घटनेची माहिती कळताच क्रांती चौकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी धाव घेतली.

पहिला प्रयत्नात पठाण सतर्क राहिले, पण...पठाण बँकेतून बाहेर पडताच चोरांनी त्यांची बॅग हिसकावण्याचे नियोजन केले होते. पठाण यांच्याजवळ दोन शंभर रुपयांच्या नोटा फेकून त्यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. पठाण सतर्क राहिले व माझे पैसे नाहीत, असे म्हणून प्रतिसाद न देता निघून गेले. परंतु तरीही चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि त्यातच पठाण यांची दुचाकी पंक्चर झाली. पंपावर पंक्चर चालकाला पैसे देताना त्यांनी पैशांची बॅग दुचाकीवर ठेवली आणि तीच संधी चोरांनी साधली. पुढे मोंढा, आकाशवाणी, उस्मानपुरा ते लिंक रोड, वाळूजमार्गे चोर शहराबाहेर पडले. एकाने हेल्मेट तर एकाने मास्क घातला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद