शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

फळबाजार बहरला; शहागंजात द्राक्षांच्या घडाला गुलाबाचा साज

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 05, 2024 12:15 PM

हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर

छत्रपती संभाजीनगर : आंबट-गोड द्राक्षांची चव बहुतेकांना आवडते. त्यात द्राक्षांचा घडा हातात धरून तो खाण्याची मजा काही औरच असते. बाजारात हातगाड्या हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांच्या घडाने बहरून गेल्या आहेत. शहागंजात जिकडे पाहावे तिकडे द्राक्षेच विक्रीला आल्याचे दिसून येत आहे. काही विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी द्राक्षाच्या घडाला गुलाबाचा साज चढविला आहे. यामुळे हिरव्या, काळ्या रंगाच्या घडात गुलाब खोचल्याने द्राक्षाचा हारच जणू हातगाडीवर लटकविल्यासारखे वाटत आहे.

कुठून आले द्राक्ष ?शहरात सोलापूर मार्गावरून द्राक्षे मोठ्या प्रमाणात येत आहे. यात हिरव्या, काळ्या व लाल द्राक्षांचा समावेश आहे. जाधववाडी कृउबा समितीच्या अडत बाजारात दररोज १० टनांपेक्षा अधिक द्राक्षे विक्रीला येत आहेत. एकट्या शहागंजात दररोज १०० कॅरेट (एका कॅरेटमध्ये २० किलो) द्राक्ष विकली जात आहेत.

हिरव्या द्राक्षाला पसंतीकाळी द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असली तरी ग्राहक हिरव्या द्राक्ष खरेदीलाच जास्त पसंती देत आहेत.

६० ते १०० रुपये किलोबाजारात द्राक्षे ६० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. यात हिरवी द्राक्षे ५० ते ७० रुपये तर काळी ७० ते १०० रुपये किलोने विकत आहेत.

अवकाळी पावसाचा परिणामडिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांना मोठा फटका बसला. त्यानंतर कधी ढगाळ वातावरण, वाढती थंडी याचाही परिणाम द्राक्षाच्या रंगावर व आकारावर झाला. तसेच काही प्रमाणात द्राक्षांची गोडी उतरली.

द्राक्ष खाण्याचे फायदे, आहारतज्ज्ञ सांगतात...१) द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. यामुळे संसर्गाशी लढण्यास ते मदत करते.२) द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखता येते.३) द्राक्षांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात येते.४) द्राक्षाचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी द्राक्षात गुलाबप्रत्येक व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. तशीच शहागंजातही १०० पेक्षा अधिक फळविक्रेते आहेत. त्यातील निम्म्यांकडे द्राक्षे विकली जात आहेत. आपल्याच हातगाडीवरील द्राक्ष ग्राहकांनी खरेदी करावे, यासाठी प्रत्येक जण कल्पना लढवित असतो. सध्या गुलाब स्वस्त असल्याने विक्रेत्यांनी द्राक्षाच्या घडाला लाल गुलाब खोचल्याने ते आणखी आकर्षक झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हातगाडीवरील क्विंटलभर फळे विक्री झाली.- जुनेद चांद खान, फळ वितरक

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबादfruitsफळे