शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भट्ट्या पेटल्या; गुढी पाढव्यासाठी साखरगाठी तयार, घरजावयांसाठी असते खास निर्मिती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 18, 2024 12:24 IST

पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : नववर्षाला घरोघरी गुढी उभारली जाते, तिला साखरगाठी घातली जाते. तसेच लहान मुलांच्या गळ्यातही साखर गाठी घालून नववर्ष साजरे केले जाते. यासाठी यंदा व्यापाऱ्यांनी जवळपास ५० टन साखरगाठीची तरतूद केली आहे. पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे. शहराची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांनी जालना परभणी, नगर एवढेच नव्हे तर गुजरातेतून २० टन साखरगाठी मागविल्या आहेत.

शहरात किती पारंपरिक कारखानेशहरात २० वर्षांपूर्वी साखरगाठी बनविणारे २५ पेक्षा अधिक कारखाने होते. आजघडीला गुलमंडी, कैलासनगर, रेंगटीपुरा, जिन्सी, सिडको, चिकलठाणा येथे एकूण ७ कारखाने सुरू आहेत. महाशिवरात्रीपासून दररोज दीड ते दोन टन साखरगाठी तयार होत आहेत.

साखरगाठीवर एकच डिझाईन ‘उगवता सूर्य’साखरगाठीवर पूर्वी अनारकली, सरू, पेटी असे ५ ते ६ डिझाईन असत; पण आता लाकडी साचे बनविणारे कमी झाल्याने फक्त ‘उगवता सूर्य’ डिझाईन साखर गाठीवर दिसून येते.

साखरगाठी बनते कसेपहिले साखरेचा मळ काढला जातो. त्यानंतर पाकात लिंबू व दूध मिसळले जाते. सागवणी साच्यात दोरी ठेवून त्यात साखर पाक भरला जातो. पाक गार व घट्ट झाल्यावर साच्यातून साखरगाठी बाहेर काढल्या जाते. मात्र, हे काम वाटतेय एवढे सोपे नाही, किचकट व चिकट काम असते.

साखरगाठीत ४० रुपयांनी भाववाढसाखरगाठीसाठी सागवाणी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या १५०० वरून ३ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. ७० रुपये किलोचा लिंबू २०० रुपयात मिळतो आहे. तर १९० रुपये किलोची दोरा २४० रुपये किलोने मिळत आहे. परिणामी, साखरगाठीचे भाव ४० रुपयांनी वधारुन सध्या १४० ते १६० रुपये किलो झाले आहेत.- जगन्नाथ बसैये, साखर गाठी उत्पादक

गुजरातची साखरगाठी ‘कडक’मराठवाड्यात साखरगाठी तयार करण्यासाठी सागवाणी साचे वापरले जातात. नरम असल्याने या साखरगाठी लहानमुलेही सहज खाऊ शकतात. मात्र, गुजरातमध्ये लोखंडी मशीनमध्ये साखरगाठी तयार होतात. त्या कडक होऊन जातात. लहान मुलांना दाताने तोडणे कठीण जाते.

जावई नाराजपूर्वी लाडक्या जावयासाठी नोटा लावलेल्या साखरगाठी येत असे. मात्र, सरकारने त्यावर बंदी आणली आहे. यामुळे नोटा लावलेल्या साखरगाठी मिळत नसल्याने जावई वर्ग नाराज आहे; पण घरजावईसाठी आरसा लावलेल्या साखरगाठी बाजारात आल्या आहेत.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाAurangabadऔरंगाबाद