छत्रपती संभाजीनगर- मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. २४ डिसेंबर पर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिला आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऑनलाइन सट्टेबाजी ॲप बेकायदेशीर नाही, सरकार २८% जीएसटी घेते, काँग्रेसचा भाजपावर पलटवार
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा उपोषण थांबवण्याची विनंती केली. यावेळी सरकारने जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. सरकारनेही या वेळेपर्यंत मराठा आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, सरकारला वेळ २ जानेवारी दिली की २४ डिसेंबर यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे आज जरांगे पाटील यांनी हे सरकार २४ डिसेंबरच्या आतच मराठा आरक्षण देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, हे सरकार २४ तारखेच्या आत काम करणारच, गुलाल उधळायला तयार होणार आहेत.जेव्हा आम्ही चौघं बच्चू भाऊ, धोंदे, चिवटे आणि मी बसलो होतो तेव्हा म्हणालो २४ तारीख. नंतर मंत्री आले आणि गोंगाटा झाला, ते म्हणाले २ तारीख द्या. शेवटची तारीख २४ डिसेंबरच आहे, या तारखेच्या आतच समाजाचं कल्याण होईल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
'समित्या आणि राज्य मागासवर्ग आयोग यावर तातडीने काम करणार, ही समाजासाठी आनंदाची बाब आहे. सरकार २४ तारखेच्या आत मराठा आरक्षणाचं काम करणारच आहे, गुलाल उधळायला तयार होणार आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाचं लेकरू म्हणून सरकार आणि विरोधी पक्षाची काही दुश्मनी नाही. समाजातील लोकांचं कल्याण व्हावं म्हणून भांडतोय. आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे, अर्धवट घेणार नाही. मी सरकारच्या बाजूचा नाही जातीच्या बाजूचा आहे,मुख्यमंत्र्यांनी फोन करुन तब्येतीची विचारपूस केली. आमचं काम होणार हा विश्वास आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.