शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

'आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष', हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुकारणार आंदोलन

By बापू सोळुंके | Published: September 05, 2023 7:32 PM

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहेत. अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबांना स्वत:ची घरे नाही, त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घेतले नाही, यामुळे आज आजारपणात त्यांना दवाखान्यात उपचार घेता येत नाही, अशी खंत व्यक्त करीत स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले  जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब  सोळुंके यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विविध राज्यात ४० ते ५० हजार रुपये मानधन दिले जाते. तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी १० हजाराचे मानधन २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना विनाअट शासकीय सेवेत घेण्याचा ४ मार्च १९९१ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरीतील अनुशेष भरुन काढावा,स्वातंत्र्यसैनिकंाना वैद्यकीय अनुदानात वाढ करावी, स्वातंत्र्यसैनिकांना घर बांंधण्यासाठी १० लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत.  हे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ महिन्यापूर्वी दिले होते. मात्र अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे वारसदार १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर धरणे , रास्ता रोको, झेंडा मार्च आणि पदयात्रा आदी प्रकारची आंदोलन करणार आहोत. 

एकही मागणी पूर्ण नाहीसंघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांकडे शासनाला विसर पडला आहे.  गतवर्षी विविध मागण्यासाठी मुंबईत आंदोलन केले होते  तेव्हा मुख्यमंत्र्यांनी  मागण्या मान्य  केल्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप एकही मागणी पूर्ण केली नाही. या पत्रकार परिषदेला स्वतंत्रसेनानी विश्वनाथ मोहिते, बाबासाहेब कोलते , दशरथ थोरात, अशोेक पुंगळे, एकनाथ इंगळे,सुशील पाटील आदी उपस्थित होते.

असे असेल आंदोलन-१३ मार्च रोजी सकाळी १० वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत झेंडा मार्च  -१४ सप्टेंबरी राेजी सकाळी १० वाजता उद्घोष प्रभात फेरी क्रांतीचौक ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकापर्यंत.- १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील मुख्य रस्त्यावर रास्तारोको -. -१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय करणाऱ्या जी.आर.ची होळी .-- १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार  टाकणे.-१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे पायी पदयात्रा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा